◻️अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थी व नागरीकाची होणारी ससेहोलपट थांबली
संगमनेर Live | अतिवृष्टीमुळे संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द ते पिंप्री फाटा या दरम्यानचा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे आश्वी खुर्द येथे शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यासह विविध कामानिमित्त येणाऱ्या नागरीकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबतची माहिती महसूलमंत्री ना. विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला मिळताचं स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाच्या मदतीने रस्त्याचा प्रश्न सोडवण्यात आल्यामुळे नागरीकानी ना. विखे पाटील व सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी पिप्रीं - लौकी आजमपूर व परिसरातील नागरीकाना संगमनेर, लोणी या ठिकाणी जाण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्याना शाळेत व महाविद्यालयात येण्यासाठी पिप्रीं फाटा ते आश्वी खर्द हा एकमेव जवळचा रस्ता आहे. मागील काही दिवसापासून परिसरात अतिवृष्टी सुरु असल्याने हा रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे शालेय विद्यार्थी व नागरीकाना या रस्त्यावरुन प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच पिंप्रीं, खळी, शिबलापुर व दाढ या गावातील नागरीकाना आश्वी खुर्द व बुद्रुक येथिल व्यापारी बाजार पेठेकडे येण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता.
त्यामुळे स्थानिक नागरीकानी याबबतची माहिती महसूलमंत्री ना. विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयाला कळवली होती. माहिती मिळताचं प्रवरा कारखान्याचे संचालक डॉ. दिनकर गायकवाड, माजी संचालक बाळासाहेब मांढरे, आश्वी खुर्द चे सरपंच म्हाळू गायकवाड, उप सरपंच सुनील मांढरे व सदंस्यानी हा रस्ता पुरववत करण्यासाठी पावले उचलली. यावेळी रस्त्याच्या कडेने चर खादून रस्त्यावर साचलेले पाणी काढून देण्यात आले. त्यामुळे हा रस्ता पुर्ववत सुरु झाला आहे.
दरम्यान ग्रामपंचायत सदस्य एकनाथ मुन्तोडे, भारत साबळे, रमेश गिते, सुयोग सोनवणे, कैलास गायकवाड, अमोल लक्ष्मण गायकवाड, संजय गायकवाड, भास्कर गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, आदिनाथ जाधव, दत्तात्रय गपले, संदिप गिते, बाळासाहेब गिते, नागेश गिते, चंद्रभान गिते, अशोक दराडी, अशोक गिते, पांडुरंग गिते, राजेंद्र गिते, सुनील गिते, रंगनाथ म्हस्के, नामदेव गिते, गोविंद गपले, कुणाल दुबे, गोविंद दुबे, रामनाथ दुबे, श्रावण दिघे, विष्णूपंत गाढे यानी रस्त्यावरील पाण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्यामुळे या सर्वासह ना. राधाकृष्ण विखे पाटील, जनसेवा मंडळ व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी यांचे नागरीकानी आभार मानले आहेत.
