संगमनेर Live | केंद्र सरकारने देशातील नागरीकांसाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य योजना सुरु करुन दिलासा दिला आहे. आयुष्यमान भारत योजनेमुळे सामान्यातील सामान्य माणसाला आधार देणारे ठरले असून, केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने कोल्हेवाडी येथे आरोग्य शिबीराचे उद्घाटन सौ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या आरोग्य शिबीरात नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर, आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना कार्डचे वितरण करण्यात आले.
महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदार संघात आरोग्य उपक्रमातून सेवा पंधरवडा संपन्न होत असून, कोल्हेवाडी येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस किरण गुंजाळ, नानासाहेब दिघे यांच्या पुढाकाराने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराच्या उद्घाटनास भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. अशोक इथापे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, किसान आघाडीचे सतिष कानवडे, अभियांत्रिकी सेलचे हरिषचंद्र चकोर, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, अकोल खताळ, अमोल दिघे, सतिष दिघे, प्रदिप शिंदे, साहेबराव वलवे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
