◻️ संगमनेर तालुक्याचे भुमिपुत्र व भारताचे थोर शास्रज्ञ डॉ. आर. एस. शिंदे यांच्यासह विविध मान्यंवर राहणार उपस्थित
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्र महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभाग तसेच विज्ञान शाखेने दि. २९ व ३० रोजी दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. रामनाथ पवार यांनी दिली आहे.
या चर्चासत्राचे उध्दघाटन गुरुवारी सकाळी १० वा. संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संगमनेर तालुक्याचे भुमिपुत्र व भारताचे थोर शास्त्रज्ञ डॉ. आर. एस. शिंदे व डॉ. एच. जी. विधाते उपस्थित राहणार आहेत. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अण्णासाहेब भोसले, प्रवरा बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, संचालक रामभाऊ भूसाळ, बाळासाहेब मांढरे, भाऊसाहेब जऱ्हाड, अँड. रोहिनीताई किशोर निघुते, निवृत्ती सांगळे आदि उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी स्पर्धा सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनानंतर ११ ते ५ या वेळेत विविध महाविद्यालयातून येणारे प्राध्यापक व विद्यार्थी शोधनिबंधाचे वाचन करणार आहेत.
शुक्रवारी चर्चासात्राच्या समारोपासाठी अध्यक्षस्थानी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे डॉ. प्रदीप दिघे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवानंद हिरेमठ, डॉ. महेश खर्डे, डॉ. हरिभाऊ आहेर, डॉ. प्रभाकर डोंगरे, डॉ. सोमनाथ घोलप, डॉ. भाऊसाहेब रणपिसे, डॉ. रामचंद्र रसाळ आदि उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी जास्तीत जास्त संख्यने या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्रासाठी उपस्थित रहावे असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डी. डी. दाभाडे यांनी केले आहे.