◻️ आश्वी बुद्रुक येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३५ वी जयंती उत्सहात साजरी
संगमनेर Live | गोर - गरीबाची पोर अंगाखांद्यावर वेचून आणून त्याना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सोडून निखळ माणूस करुन सोडण्याचे काम कर्मवीर आण्णांनी केले. वटवृक्षाचे बोधचिन्ह चिन्ह घेऊन शिक्षण संस्था सुरु केली असता या शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळेचं आज अशिया खंडातील सगळ्यात मोठी शिक्षण संस्था उभी करण्यात यश आले आहे. कर्मवीर आण्णानी अनवाणी पायांनी सह्याद्रीच्या कडे - कपारीतून फिरत गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी शिक्षण मिळावे म्हणून खूप कष्ट सोसले व मोठा त्याग केला. असे प्रतिपादन प्रा. एल. पी. कोल्हे यांनी केले. यावेळी विद्यालयातील प्रगती आलेखाचे ही त्यानी कौतुक केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल येथे पद्मभुषन डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना साहित्यिक व प्रा. एल. पी. कोल्हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे जेष्ठ सदंस्य बाळकृष्ण होडगर होते. नानासाहेब डोईफोडे, सुभाषराव म्हसे, किशोर जऱ्हाड, सुमतीलाल गांधी, सुशिल भंडारी, व्ही. पी. म्हसे, माजी प्राचार्य आंधळे, शामराव शिदें, पत्रकार संजय गायकवाड, रविंद्र बालोटे, अनिल शेळके, अमोल राखपसरे, सौ. लिलाताई नाके, शकुंतलाताई चितांमणी, मांढरे, गायकवाड, कापडणीस, विजय केदारी, विद्यालयाचे प्राचार्य जे. आर. बर्डे आदि यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करत रांगोळी दालनाचे उध्दघाटन केले.
यावेळी विद्यालयाचे माजी प्राचार्य एस. एन. दिघे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक भान ठेवून आपले काम चोख केले पाहिजे असे सांगितले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी नानासाहेब डोईफोडे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यामध्ये प्रचंड गुणवत्ता असून दहावी व बारावीच्या उत्कृष्ट निकालाबद्दल विद्यार्थी व शिक्षकाचे कौतुक केले.
यावेळी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका एस. एफ. संसारे यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांचा मान्यंवराच्या हस्तें सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेचं विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्याना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व पाहुण्यांचा परिचय विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ए. डी. बनसोडे यांनी करुन दिला. विद्यालयाचे प्राचार्य जे. आर. बर्डे यांनी शाखा इतिहासाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका गाडे यांनी केले तर आभार शिक्षिका एस. एफ. संसारे यांनी मानले. दरम्यान हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आर. एन. शहाणे, आ. बी. थेटे, बनकर, घिगे, धराडे , कोकाटे, बर्डे, कहार सिनारे, साबळे, उंबरकर, शिंदे, पिंपळे तसेच शिक्षिका सहाणे, वाकचौरे, आव्हाड, वाय. टी. निघूते, पी. बी. निघूते, एस. पी. काळे, रुपवते, वायळ, पोखरकर, पाटील, मुन्तोडे, जगदाळे, वैद्य याच्यांसह कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत सामाजिक कार्यात सदैव आग्रेसर असलेल्या आश्वी खुर्द येथिल श्री स्वामी समर्थ उद्योग समुहाचे संस्थापक संजय गायकवाड, मार्गदर्शक आदिनाथ जाधव, अनिल शेळके, सचिन पोपळघट, कृष्णा हारदे, ऋषिकेश डमाळे यानी विद्यालयातील इयत्ता ७ वी तील गुणवंत विद्यार्थीनी कल्याणी रवीद्रं बर्डे हिला शाळेत येण्या-जाण्यासाठी सायकल देऊन आपले सामाजिक दायित्व जपले आहे.
