◻️ महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
◻️ केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत मिळाला निधी
◻️नविन पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव, वाड्या वस्त्यांपर्यत नविन पाईप लाईन, स्वतंत्र ट्रान्सफार्मार व सोलर मिळणार
◻️जोर्वे आणि पंचक्रोशितील वाड्या वस्त्यांचा पाणी प्रश्न कायस्वरूपी सुटणार
संगमनेर Live | शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या जोर्वे गावासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेकरीता १४ कोटी ६९ लाख रुपयांचा निधीस मान्यता मिळाली असल्याची माहीती महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जोर्वे आणि पंचक्रोशितील वाड्या वस्त्यांचा पाणी प्रश्न कायस्वरूपी सुटावा म्हणून केंद्र सरकारने ग्रामीण भागाकरीता सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेत जोर्वे गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूरीसाठी सादर करण्यात आला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पाणी पुरवठा विभागाचे मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून सदर योजनेस निधीची मंजूरी प्राप्त करुन घेतल्याने जोर्वे गावाच्या पाणी पुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागातील पाणी प्रश्नाकरीता देशात जलजीवन मिशन कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक गावातील कुटुंबाला पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याचा निर्धार केला असून त्याची अंमलबजावणी सुध्दा सुरू झाली असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून कार्यान्वित होत असलेल्या योजनेतून गावाला नविन पाच पाण्याच्या टाक्या, साठवण तलाव, वाड्या वस्त्यांपर्यत नविन पाईप लाईन स्वतंत्र ट्रान्सफार्मार सोलर योजना आशा तरतुदींचा समावेश करण्यात आला असल्याचे विखे यांनी सांगितले.
वाढत्या लोकसंख्येचा विचार करून या पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी होणार असल्याने जोर्वे आणि पंचक्रोशितील सर्व वाड्या वस्त्यांवरील कुटुंबाना स्वच्छ आणि शुध्द पाणी देण्याचा निर्धार केंद्र आणि राज्य सरकारचा असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.