◻️ संगमनेर शहर पोलीस प्रमुख यांना निवेदन
◻️ विद्यार्थ्यानसह महाविद्यालयीन मुलीना मनस्ताप
◻️ ..अन्यथा टपोरी गँग चा समाचार घेतला जाईल
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील बस स्थानक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून बस स्थानक परिसरातून रोज एक दोन दुचाकी चोरीला जात आहेत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना व जास्त प्रमाणात मुलींना शहरी भागातील टवाळखोर मुले नाहक त्रास देण्याचे प्रकार सतत घडत असल्यामुळे नागरीकाना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संगमनेर बस स्थानकामध्ये पोलीस चौकी सुरु करण्याची आग्रही मागणी संगमनेर मनसेने निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, मुलींची छेडछाड असेल किंवा महाविद्यालयाच्या मुलांना धमकावणे अश्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी संगमनेर बस स्थानक परिसरात पोलीस चौकी पुन्हा सुरु करा असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना संगमनेर च्या वतीने निवेदन संगमनेर शहर पोलीस प्रमुख भोसले याना देऊन मागणी करण्यात आली. कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने या टपोरी गँग चा समाचार घेतला जाईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शरद गोर्डे, तालुका अध्यक्ष अशोक शिंदे, शहर अध्यक्ष तुषार ठाकूर, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष दिपक वर्पे, उपाध्यक्ष तुषार बढे, अभिजित घाडगे, संग्राम हासे, महेश उदमले, आकाश भोसले आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.