हिदूं मंदिराचे मुस्लिम पुजारी चाचाच्या निधनाने प्रतापपूरचं नव्हे तर, आश्वी पंचक्रोशीही हळहळली

संगमनेर Live
0
◻️ मागील २२ वर्षापासून मानमोडे बाबा मंदीरात अखंडीत दिवाबत्ती व पुजाआर्चा

◻️ ग्रामस्थांकडून हिदूं परंपरां नुसार अत्यंविधी

◻️ भंडाऱ्याला (दशक्रिया) हजारो हिदूं बांधवाची उपस्थिती

संगमनेर Live | भारतातील बहुतांश भागात धार्मिक वाद आणि समाजातील सलोख्याचे वातावरण बिघडवले जात असल्याचे चित्र असताना संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर गावात अनोखे दृश्य पाहायला मिळाले आहे. येथिल हिदूं बांधवाचे श्रध्दास्थान असलेल्या मानमोडे बाबा मंदिराची मागील २२ वर्षापासून अखंडित काळजी घेणारी व्यक्ती हिंदू नसून मुसलमान होती. 

या चांदभाई महाराज (चाचा) यांचे नुकतेचं निधन झाले असून त्याचां अत्यंविधी हिदूं रुढी- परंपरेनुसार पार पाडल्यानतंर त्याना श्रंध्दाजली देण्यासाठी हिदूं बांधवानी भंडाऱ्याचा (दशक्रिया) कार्यक्रम आयोजित केला. यावेळी हजार ते बाराशे नागरीकानी उपस्थिती लावून एक वेगळा व सकारात्मक आदर्श धार्मिक द्वेष निर्माण करणाऱ्यापुढे उभा केल्याने या ग्रामस्थाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तालुक्यातील प्रतापपूर गावात दिवगंत चांदभाई महाराज (चाचा) हे मागील २२ वर्षांपासून गावातील मानमोडे बाबा, शनि, गणेश व साई मंदिराची देखरेख, पुजाआर्चा, साफसफाई, मंदिरातील मूर्तीसमोर दिवाबत्ती लावणे असा त्याचा रोजचा दिन क्रम होता. चाचा हे शुध्द शाखाहारी होते. तसेच शनिवार व गुरुवार उपावास करायचे. गावातील पाच घरामध्ये भिक्षा मागून ते आपली उपजीविका चालवत होत. याकाळात गणेश गोसावी यानी त्याना मदतनीस म्हणून काम केले.

या संगळ्यामुळे प्रतापपूर ग्रामस्थाना नेहमीचं दिवगंत चांदभाई महाराज यांचे कौतुक राहिले. चाचानी अत्यंत श्रद्धेने मानमोडे बाबा सह इतर देव - देवताचीही सेवा केली. त्याच्या बदल्यात कधीही त्यानी पैशाची मागणी केली नाही. गावात साजरे होणारे सप्ताह, सण, उत्सव यात ते नेहमी हिरहिरीने सहभागी होत असल्याच्या आठवणी ग्रामस्थानी जागवल्या आहेत. 

हिदूं - मुस्लिम धर्मियानमध्ये सलोखा निर्माण करत टिकवण्याचे काम चांदभाई महाराजानी केले. त्याच्यां आजारपणाच्या काळात तब्बल १० वर्ष सचिन गजानन गिते व कै. भाऊसाहेब कोडांजी आव्हाड यांनी त्याच्यां दोन्ही वेळेसच्या जेवणाची व्यवस्था केली होती. कै. निवृत्ती इलग, कै. महादू आंधळे, कै. भिमाजी आंधळे, कै. सदाशिव आंधळे व देवराम बाबा आंधळे यानी चाचाना नेहमी मदत केली.

नुकतेचं दिवगंत चांदभाई महाराज (चाचा) यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यामुळे गावातील सर्व ग्रामस्थानी एकत्र येऊन त्याचा विधिवत हिदूं रुढी-पंरपरानुसार अत्यंविधी पार पाडला. तसेच दशक्रियाविधी निमित्त भंडाऱ्याचे आयोजन करत हभंप बाबासाहेब मगर महाराज यांचे प्रवचन व महाप्रसादाचे वाटप केले. यावेळी प्रतापपूर सह आश्वी पंचक्रोशीतून एक हजार ते बाराशे हिदूं बाधव चाचाना श्रंध्दाजली देण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे एक सकारात्मक संदेश प्रतापपूर ग्रामस्थानी दिल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान त्याच्यां दशक्रिया निमित्त आयोजित भंडाऱ्याप्रसंगी गावचे जेष्ठ नेते भगवानराव इलग, सरपंच दत्तात्रय आंधळे, कचेश्वर आंधळे, सचिन गिते, जनार्धन डोगंरे, दिनकर आंधळे, भाऊसाहेब सांगळे, शंकर खामकर, शंकर सांगळे, सुखदेव आंधळे, रंगनाथ आंधळे, बाळकृष्ण आंधळे, सुरेश इलग, भिमा सांगळे, बबन घुगे, विठ्ठल आंधळे, गजानन आव्हाड, बाळासाहेब सांगळे, मधुकर सांगळे, पांडुरंग आंधळे, बाळासाहेब गिते, श्रीधर आंधळे, सुधाकर सांगळे, आण्णासाहेब गिते, तुळशीराम आव्हाड, मुक्ताबाबा बिडवे, भाऊसाहेब बर्डे, अंकुश कांबळे, संजय घाडगे व मानमोडे बाबा शैनेश्वर मित्र मंडळाचे सर्व सदंस्य, ग्रामस्थं तसेच पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने आलेले नागरीक यावेळी उपस्थित होते.

मानमोडे बाबा मंदिर इतिहास..

ब्रिटीश काळात मानमोडे बाबा मंदिर परिसरात पाटबंधारे विभागाची चौकी होती. यावेळी याठिकाणी अनेक चित्र-विचित्र घटना घडत असल्याने त्याकाळी आश्वी सह पंचक्रोशीत मोठे प्रस्त म्हणून लौकीक असलेले कै. तुकाराम निघुते यानी याठिकाणी छोटेशे मानमोडे बाबा मंदिर उभारले होते. २० वर्षापूर्वी मालुंजे येथिल सनदी अधिकारी दिनकर भिकाजी नागरे यांच्या पुढाकारातून प्रतापपूर ग्रामस्थानी भव्य अशा मानमोडे बाबा मंदिराची उभारणी करत जिर्णोध्दार केला. 

कुंभमेळ्यात मानाचे स्थान असलेल्या ईश्वरनाथ बाबा यानी सुरवातीच्या काळात मंदिराची पुजाआर्चा केली होती. त्यांची समाधी मंदिर परिसरातचं असून प्रति शनि शिगंणापूर म्हणून या ठिकाणी शनि देवाची स्थापना करण्यात आली असून मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी याठिकाणी गर्दी करत असतात.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !