कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक व शेतकरी बांधवाना उपस्थित राहण्याचे आवाहन
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील कौठे - मलकापूर येथिल श्री गजानन महाराज शुगर लि. चा सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. २०२२-२३ चा सहावा गळीत हंगाम शुभारंभ कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रविंद्र बिरोले व सौ. अश्विनीताई बिरोले यांच्या हस्तें भक्तनगर येथे संपन्न होणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
श्री गजानन महाराज शुगर लि. ने मागील पाच गळीत हंगाम यशस्वी व विक्रमी गाळप करत पुर्ण केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यानमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पारदर्शक वजन, योग्य भाव, ऊसाचे पैसे मिळण्याची खात्री, मागेल त्याला तोड यामुळे कारखाण्याला ऊस घालण्याकडे शेतकऱ्याचा कल वाढल्याचे चित्र आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन आणि चेअरमन रविंद्र बिरोले यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे या कारखाण्याचे राज्यस्तरावर नाव झळकले आहे.
सोमवारी होणाऱ्या गळीत हंगाम शुंभारभं प्रसंगी कारखाण्याचे संचालक शंतनु बिरोले, ईशाताई शंतनु बिरोले, नंदन बिरोले, हरिभाऊ गिते, अँड. रामदास शेजुळ, केरुबापू मगर, सुभाष कोळसे याच्यासह कारखाण्याचे अधिकारी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी बांधव व पंचक्रोशीतील नागरीकानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.