◻️ महसूल मंत्री ना. विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या दोन गटात रंगणार तुल्यबळ लढती
◻️ विद्यमान चेअरमन मेजर संपतराव सांगळे गटाचे १८ तर, संस्थेचे संस्थापक गंगाधर आंधळे यांच्या गटाचे १४ उमेदवार
◻️ ३१ ऑक्टोबरला म्हणजे, माघारीच्या दिवशी चित्र होणार स्पष्ट
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अश्विनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पंतसंस्थेच्या ११ जागासाठी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या दोन गटात दुरंगी लढत होणार असून ११ जागासाठी ३२ जण रिगंणात उतरले असले तरी सोमवार दि. ३१ ऑक्टोबर रोजी म्हणजे माघारीच्या दिवशी निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
१९८५ साली स्थापन झालेली अश्विनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पंतसंस्था ही आश्वी सह पंचक्रोशीतील शेतकरी, दूध उत्पादक, लहान-मोठे उद्योजक, व्यावसायिक, दुकानदार, शेतमजूर, बचत गट याना अर्थ पुरवठा करणारी कामधेनू म्हणून मागील ३७ वर्षापासून ओळखली जाते. आश्वी बुद्रुक येथे संस्थेची स्वमालकीची भव्य इमारत असून संस्थेचे १ हजार ५८४ सभासद आहेत. संस्थेकडे तब्बल १६ कोटीच्या ठेवी असून संस्थेने ९ कोटी रुपये कर्ज वितरण केले आहे. संस्थेचे आश्वी बुद्रुक येथे मुख्य कार्यालय व शाखा असून आश्वी खुर्द, शेडगाव व पिप्रीं लौकी अजमपूर याठिकाणी संस्थेने शाखाविस्तार केला असल्याने लोकाच्या विश्वासास संस्था पात्र ठरली आहे.
नुकतीचं संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून मेजर संपतराव सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण प्रवर्गातील सहा जागासाठी विनित दिलीप गांधी, संजय शांतीलाल गांधी, भाऊसाहेब लक्ष्मण लावरे, वसंत धोडींबा वर्पे, अनिल बन्सीलाल बालोटे, तुळशीराम चांगदेव म्हस्के, सखाहरी बाबुराव नागरे, जेहूर जमादार शेख, निवृत्ती बाबुराव सांगळे, संपत बाबुराव सांगळे यानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी संपत मारुती ताजणे व हरिभाऊ दत्तु ताजणे, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी भगवान गोधाजी खामकर व शांता विजय ब्राम्हणे, महिला राखीव प्रवर्गातील दोन जागासाठी बेबीताई पांडुरंग दातीर, कल्पना गोवर्धन बोद्रें, पुष्पा बाळासाहेब भवर व निकिता शंकर नागरे, वि.जा.भ.ज. प्रवर्गातील एका जागेसाठी राजेद्रं लहानु गिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दुसऱ्या गटातकडून संस्थेच संस्थापक गंगाधर आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण प्रवर्गातील सहा जागासाठी गंगाधर बजाबा आंधळे, विलास मुरलीधर आंधळे, रघुनाथ गजाबा जाधव, भिका पंढरीनाथ गिते, विठ्ठल मारुती गायकवाड, हौशीराम बाबुराव फड, राजेद्रं बबन बोद्रें, कैलास किसन नागरे यानी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
तसेच इतर मागास प्रवर्गातील एका जागेसाठी रामदास पांडुरंग ताजणे, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील एका जागेसाठी संपत देवजी कदम, महिला राखीव प्रवर्गातील दोन जागासाठी वैशाली बबन शिदें व लिला कैलास नागरे, वि.जा.भ. प्रवर्गातील एका जागेसाठी भानुदास सखाराम आंधळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान संस्थेच्या संचालकपदासाठी १३ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून बाहेरील मतदान या निवडणूकीत निर्णायक भुमिका बजावेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कापसे हे काम पहात असून संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब डहाळे त्याना याकामी मदत करत आहेत.