◻️ ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याची बिरोले यांची ग्वाही
◻️ सभासदासाठी दिवाळीनिमित्त मोफत साखर वाटप
संगमनेर Live | मागील पाच गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने दाखवलेल्या विश्वासामुळेचं श्री गजानन महाराज साखर कारखाण्याचा आज यशस्वीपणे सहावा गळीत हंगाम सुरु झाला आहे. जिल्ह्यातील इतर साखर कारखाण्याशी कोणतीही स्पर्धा करण्याऐवजी ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य भाव देऊन ऊस वेळेत तोडून नेण्यावर आमचा भर असणार आहे. शेतकऱ्याना दिलेल्या शब्दानुसार शेतकऱ्यांची राहिलेली उर्वरीत रक्कम दिवाळीपुर्वी शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या जीवावर सहावा गळीत हंगाम यशस्वी करु अशी ग्वाही श्री गजानन महाराज साखर कारखाण्याचे संस्थापक चेअरमन रविद्रं बिरोले यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे सोमवारी सकाळी कारखाना कार्यस्थळावरील भक्तनगर येथे आयोजित श्री गजानन महाराज साखर कारखाण्याच्या सहाव्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना रविद्रं बिरोले बोलत होते.
यावेळी संचालिका अश्विनीताई बिरोले, संचालक शंतनु बिरोले, ईशाताई बिरोले, नदंंन बिरोले, जेष्ठ संचालक अँड. रामदास शेजुळ, हरीभाऊ गिते, सुभाष कोळसे, केरूबापू मगर, जनरल मँनेजर बी. एन. पवार, वर्क्स मँनेजर अनिल वाकचौरे, भाऊसाहेब मंडलिक, देशमाने, अजित गुळवे, गोरक्षनाथ डहाळे, रणावरे, माजीद फारुकी, वर्पे, जाधव, खरात, बारहाते, तांबे, इंगळे, बाबाजी सागर, योगेश खेमनर, सुभाष खेमनर, बुवाजी खेमनर, तान्हाजी बागुल, बाळासाहेब खेमनर, नवनाथ ढेंबरे, शिवाजी भोसले, युवराज पोळ, तोडकर, लालु शेख, कैलास डोंगरे, तुळशीराम परचंडे, गुलाब भोसले, सुभाष घुले, विकास काकडे, अण्णासाहेब काळनर, शेतकरी अभिजीत ढेपे, शरद बहीरट, शांताराम नागरे, सुरेश मगर, रामकिसन गायकवाड, अनिल कोकणे आदि उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बिरोले पुढे म्हणाले की, चालू वर्षी मोठ्या प्रमाणात ऊस गाळापासाठी तयार असताना अतिवृष्टी व सततधार पावसामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतू शेतकऱ्यानी घाबरुन जाऊ नये. कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून जास्तीत जास्त प्रमाणात ऊस गाळपाचे उद्दिष्टे कारखाण्याने डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण सुरु केले आहे.
प्रत्येक विभागात ऊस तोडणी टोळ्या नेमल्या असल्याची माहिती देऊन ते म्हणाले की, आम्ही कारखाना परिसर असा ३० कि. मी. चा विभाग बनवला आहे. या परिसरातील शेतकऱ्याचा १४ ते १५ महिन्याचा ऊस तोडणीला आम्ही प्राधान्य देणार आहोत. त्यामुळे या शेतकऱ्याना २० ते ३० टक्के वजणात फायदा होणार असल्याने शेतकऱ्यानी क्षणिक अमिषाला बळी न पडता, गाळपासाठी कारखाण्याला ऊस पाठवण्यासाठी पुढाकार घेऊन ऊस तोडणीसाठी कारखाना प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात गाळप हंगामासाठी परवानगी मिळालेल्या चार कारखाण्यामध्ये श्री गजानन महाराज साखर कारखाण्याचे नाव असणे ही आपल्या प्रामाणिक पणाची पावती असल्याचे शेवटी सागितले आहे.
कारखाना सभासदाना मोफत साखर
श्री गजानन महाराज साखर कारखाण्याच्या सभासदाना मोफत साखर वाटप केले जाणार असल्याची घोषणा बिरोले यानी करुन सर्व ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांना दिपावलीच्या शुभेच्छां दिल्या आहेत.