◻️ या.? काळात राहणार श्री साईबाबाचे दर्शन बंद
◻️ संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची माहिती
संगमनेर Live (शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सुर्यग्रहण (ग्रस्तास्त) असल्यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
दुपारी ४.४० ते सायंकाळी ६.३१ यावेळेत श्रींचे समोर मंत्रोच्चार होणार असल्यामुळे मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, दि. २५ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४.४० ते सायंकाळी ६.३१ याकाळात खंडग्रास सुर्यग्रहण (ग्रस्तास्त) आलेले आहे. यामध्ये दुपारी ४.४० वाजता श्रींचे दर्शन बंद होईल, दुपारी ४.५० वाजता समाधी मंदिरात मंत्रोपच्चार सुरु होईल.
सायंकाळी ६.३१ वाजता मंत्रोपच्चार संपल्यानंतर सायंकाळी ६.४० वा. श्रींचे मंगलस्नान होईल. त्यानंतर सायंकाळी ६.५५ वाजता श्रींची ‘शिरडी माझे पंढरपूर’ ही आरती होईल. सायंकाळी ७.१५ वाजता श्रींची धुपारती होईल. आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी दर्शनरांगा पुर्वीप्रमाणे सुरु होईल.
तसेच सदर ग्रहण काळात श्रींच्या समोर मंत्रोच्चार होईपर्यंत भाविकांना समाधी मंदिराचे सभामंडपापासुन दर्शन सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सांगुन सर्व साईभक्तांनी याची नोंद घेवुन सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.