◻️ शेडमध्ये ठेवलेल्या ३६ हजार रुपये किमंतीच्या ८ गोण्या केल्या लपांस
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारात ३६ हजार रुपये किमंतीचे सोयाबीन चोरीस गेल्यामुळे सिताराम बाळकृष्ण नागरे या शेतकऱ्यावर मोठे अर्थिक संकट कोसळले आहे. तर यामुळे शिबलापूर सह पंचक्रोशीतील शेतकऱ्यानमध्ये मोठी खळबळ उडाली असून या चोरट्याना जेरबंद करण्याची मागणी नागरीकानी केली आहे.
शिबलापूर - पानोडी रस्त्यावर शेतकरी बाळकृष्ण नागरे यांची शेती व वस्ती आहे. त्यानी शेतातून चार-पाच दिवसांपूर्वी सोयाबीन काढणी करून ८ गोण्यांमध्ये भरून वस्तीवरील शेडमध्ये ठेवली होती. मात्र, सोमवार (दि. ३१) सकाळी रोजच्याप्रमाणे शेडमध्ये पाहिले असता शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या ८ गोण्या अंदाजे ३६ हजार रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्यानी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रविवारी (दि. ३०) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास सोयाबीन गोण्याची चोरी करताना दोन चोरटे त्याना दिसून आले आहेत.
अगोदरचं नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या कष्टाने सोयाबीनचे शेतकऱ्याने उत्पादन घेतले. विक्रीसाठी साठवून सोयाबीन ठेवली असता चोरट्यांनी ही ती सोयाबीन चोरुन नेली. आसमानी संकटाबरोबरचं सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यानवर आली असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात याबाबत गुरंव नबंर २००/२०२२ नुसार भादंवी कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
चोरट्यानी आता थेट शेतकऱ्याच्या शेतमालाकडे मोर्चा वळवल्यामुळे शिबलापूर सह पंचक्रोशीतील शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र निर्माण झाले असून हे चोरटे सीसीटीव्ही कँमेरात कैद झाल्यामुळे लवकरचं त्याच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.