◻️ दिपावलीनिमित्त ६८ लाख ७९ हजार ९०१ रुपये दूध उत्पादकाच्या खात्यात जमा
◻️ सभासदाना १२ टक्के डिव्हिडंडचे वाटप
संगमनेर Live | आश्वी खुर्द येथिल अग्रमानांकित दूध संस्था म्हणून प्रसिद्ध असलेल्या आश्वी खुर्द सहकारी दूध उत्पादक संस्थेकडून दिपावलीनिमित्त दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ३० पैसे प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ६८ लाख ७९ हजार ९०१ रुपये वर्ग करण्यात आले आहे.
आश्वी खुर्द स eहकारी दूध उत्पादक संस्था ही दूध उत्पादकाची कामधेनु म्हणून परिसरात ओळखली जाते. पारदर्शक व्यवहार, योग्य वजन व वेळेत नियमित पगार यामुळे संस्थेने सभासद व दूध उत्पादकामध्ये विश्वास निर्माण केल्यामुळे संस्थेकडे दूध घालणाऱ्याची संख्या वाढत आहे.
यावर्षी दिपावलीनिमित्त संस्थेने दूध उत्पादकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ३० पैसे प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ६८ लाख ७९ हजार ९०१ रुपये वर्ग केले असून सभासदाना १२ टक्के डिव्हिडंडचे वाटप केले आहे. तसेच बार ही महिने दोन्ही वेळेस दूध घालणाऱ्या दूध उत्पादकाना किराणा वस्तू म्हणून ४ लिटर गोडतेलाचे वाटप केले आहे.
दरम्यान नेहमी दूध उत्पादक व सभासदाच्या हितासाठी झटणाऱ्या संस्थेने दिवाळीनिमित्त दिलेल्या भेटीमुळे सभासद व दूध उत्पादकानमध्ये आनंदाचे वातावरण असून संस्थेचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, संस्थेचे सचिव व कर्मचारी यांनी दिपावलीनिमित्त सर्वाना शुभेच्छां दिल्या आहेत.