◻️ अग्निशमन बंब येण्याआधीचं ऊस जळून खाक ; तरुणाचे प्रयत्न पडले तोकडे
◻️ नारळाच्या झाडाने ५० फूट उंचावर घेतला पेट
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे शनिवारी दुपारी वीज वाहक ताराच्या घर्षणामुळे लागलेल्या भिषण अग्नीमध्ये येथील पाच शेतकऱ्याचा तब्बल १० एकर ऊस जळून खाक झाला असून या शेतकऱ्याचे अंदाजे २० लाखाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यानी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ओझर खुर्द शिवारातील नेमबाई माळ पायथ्यालगत सावित्रीबाई दत्तु साबळे याची गट नबंर २११/३, विठाबाई लक्ष्मण साबळे याची गट नबंर २११/४, उज्ज्वला शिवराम साबळे याची गट नबंर २११/४, बनाजी बाळाजी साबळे याची गट नबंर २१४/३ व मधुकर सखाराम ठोसर याची गट नबंर १८८ मध्ये ऊसाची शेती आहे. शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वीज वाहक ताराच्या घर्षणामुळे थिनग्या खाली पडल्यामुळे ऊसातील पाचटाने पेट घेतला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
अग्नीसह धुराचे मोठे लोळ आकाशाकडे जात असल्याचे लक्षात आल्यामुळे स्थानिक नागरीकासह शेतकऱ्यानी अग्नीने उग्रं रुप धारण केलेल्या ऊसाच्या शेताकडे धाव घेतली. यावेळी सरपंच पुंजाहरी शिदें, ग्रामपंचायत सदंस्य बकचंद साबळे, लक्ष्मण साबळे, विठ्ठल सांळुखे, कैलास गोराणे, जयराम कांदळकर, कचरु शिदें, भिका कांदळकर, दौलत बनवाले, साहेबराव उंबरकर, झुंगा साबळे, जगन शिदें, शिवराम साबळे, मधुकर ठोसर, बनाजी साबळे, जिजाभाऊ शिदें, विनायक कांदळकर, कारभारी साबळे, धोडींबा बनवाले, दत्तु शिदें यानी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नं केल्यामुळे शेजारी असलेला शेकडो एकर ऊस वाचवण्यात त्याना यश आले आहे.
दरम्यान यावेळी संगमनेर कारखाण्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला असला तरी, तोपर्यत तब्बल १० एकर ऊस जाळून खाक झाला होता. त्यामुळे सावित्रीबाई दत्तु साबळे, विठाबाई लक्ष्मण साबळे, उज्ज्वला शिवराम साबळे, बनाजी बाळाजी साबळे, मधुकर सखाराम ठोसर या पाच शेतकऱ्याचे अंदाजे २० लाखाचे नुकसान झाल्याची माहिती स्थानिकानी दिली असून या शेतकऱ्याना भरपाई देण्याची मागणी केली आहे.
यावेळी ५० ते ६० फूट उंच असलेल्या नारळाच्या झाडाला आग लागल्यामुळे आश्चर्य व्यक होत असून ही आग कशी लागली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नाही.