पराभवाची चाहूल लागल्याने सत्ताधारी आता उघडे पडू पडू लागले - विलास आंधळे

संगमनेर Live
0

◻️ आमच्या प्रश्नाना उत्तरे नसल्यामुळे वैयक्तिक बदनामी करण्याचे गलिच्छ राजराकारण सुरु

◻️ संस्था स्थापनेचा उद्देशचं सत्ताधाऱ्यानी गुंडाळून ठेवल्याने निवडणूकीत उतरावे लागले

◻️ कल बदलत असल्याचे जाणवल्याने सत्ताधाऱ्याकडून आदळ आपट सुरु

संगमनेर Live (रवीद्रं बालोटे) | आमचे चुलते व संस्थेचे संस्थापक गंगाधर आंधळे व त्याच्या जेष्ठ सहकाऱ्यानी शेतकरी, व्यापारी, लहान - मोठे व्यावसायिक, उद्योजक याना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे व स्थानिक अर्थकाराणाला गती मिळून ग्रामीण जीवनमान उंचवावे हा संस्था स्थापनेमागील त्याची भावना होती. 



पद्मभुषन दिवगंत मा. खा. आदरणिय बाळासाहेब विखे पाटील यांनी दिलेली गोर-गरीब तळागाळातील लोकाना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची शिकवण ही संस्थेच्या माध्यमातून आमलात आणणे हा त्यामागील संस्थापक मंडळाचा मुख्य हेतु होता. परंतु संस्था स्थापनेचा मुळ उद्देशचं सत्ताधारी मंडळाने गुंडाळून ठेवल्यामुळे आम्हाला निवडणूक लढवण्याची वेळ आली. असे सुतोवाचन विलास आंधळे यानी केले आहे.

प्रचारा दरम्यान संस्थापक गटाचे उमेदवार विलास आंधळे यानी सत्ताधारी गटाने केलेल्या सर्व आरोपाचे खंडण केले आहे. आमच्या प्रश्नाना उत्तरे नसल्यामुळे वैयक्तिक बदनामी करण्याचे गलिच्छ राजराकारण सत्ताधारी मंडळीकडून सुरु असल्याचे म्हणत पराभवाची चाहूल लागल्याने सत्ताधारी आता वैयक्तिक बदनामी करत असल्यामुळे ते दिवसेंदिवस सभासदापढे उघडे पडू लागल्याचे म्हटले आहे.

आम्ही निवडूण आल्यानतंर संस्थेचा मुख्य उद्देश मार्गी लागावा यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून कमीत - कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करणार असून अल्प भु-धारक शेतकरी, व्यापारी, लहान - मोठे व्यावसायिक, उद्योजक याना कमीत कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. 

सध्या ठेवीवरील व्याजदर व कर्जावरील व्याजदर यामध्ये मोठी तफावत असल्याने यामध्ये सुसुत्रता आणून ठेवीदार व कर्जदार यांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यामुळे संस्थेच्या सभासदानी सत्ताधाऱ्याच्या भुलथापाना बळी न पडता लोकहित व सभासद हितासाठी संस्थापकाच्या हातात संस्थेची सुत्रे देऊन राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हात मजबूत करावे असे आवाहन उमेदवार विलास आंधळे यानी सभासदाना करताना, कल बदलत असल्याचे जाणवल्यामुळेचं सत्ताधाऱ्याकडून आता आदळ आपट सुरु असल्याचे चिमटे काढले आहे.


दरम्यान प्रचाराच्या अतिम टप्यात आरोप प्रत्याआरोपाची राळ दोन्ही गटाकडून उडवण्यात ऐत आहे. दिवसेंदिवस संगमनेर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या होत चाललेल्या निवडणूक प्रचारत मोठी रंगत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणूकीत उतरलेले दोन्ही गट हे विखे पाटील परिवाराला मानणारे असल्याने प्रचार शिगेंला पोहचला असून सभासद मतदानाचे माप संस्थापक गटाच्या की सत्ताधारी गटाच्या पारड्यात टाकणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !