महाभारतातही असाचं डाव मांडला गेला, पण विजय शेवटी सत्याचा झाला - रंभाजी पाटील इलग

संगमनेर Live
0

◻️ अश्विनी पतंसस्थेच्या निवडणूक प्रचाराची शुक्रवारी सांगता

◻️  दिशाभूल करणाऱ्याना सभासद माफ करणार नाही


◻️ कट - कारस्थान करणाऱ्याचा डाव सभासदचं त्याच्यांवर उलटवतील

संगमनेर Live (रविद्रं बालोटे) | सभासद हुशार असल्याने त्याचे मतपरिवर्तन करण्यात सत्ताधारी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे जेष्ठ कार्यकर्त्याचा डोलारा ते सभासदापुढे उभे करत असले तरी, महाभारताची पुनर्वावृत्ती ही या निवडणूकीत पहायला मिळणार आहे. दुर्योधनाच्या म्हणजे कौरवाच्या बाजूने भिष्म पितामह, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, जयद्रथ असे महारथी होते. तर पांडवाच्या म्हणजे सत्याच्या बाजूने एकटे भगवान श्रीकृष्ण होते. त्यामुळे विजय कोणाचा झाला हे तुम्हाला आम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. असा महाभारतातील दाखल देत रंभाजी पाटील इलग यानी निवडणूकीतील प्रचारादरम्यान तोफ डागल्यामुळे निवडणूकीत मोठी रंगत निर्माण केली आहे.

जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अश्विनी ग्रामीण पतंसस्थेच्या २०२२ - २७ या पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रचारादरम्यान मार्गदर्शन करताना जेष्ठ मार्गदर्शक रंभाजी पाटील इलग यानी सत्ताधारी गटाचा समाचार घेताना चागलेचं फैलावर घेतले आहे.

रंभाजी पाटील इलग म्हणाले की, संस्थेच्या हितासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार मागील ४ ते ५ पंचवार्षिक निवडणूका आम्ही बिनविरोध केल्या. त्यावेळी तुम्ही आम्हाला किती सुपारी दिली.? हे सभासद व जनतेपुढे आम्हाला सुपारीबाज म्हणणाऱ्यानी खुलासा करणे गरजेचे होते. परतू संस्थेच्या हिताचे व्हिजन सभासदापुढे मांडण्याऐवजी केवळ वैयक्तिक चिकलफेक करण्यात धन्यता मानल्यामुळे सभासदाना सत्ताधाऱ्याचे वागणे पटलेले नाही. 

आमच्या काळात संस्थेच्या ठेवी वाढल्याचा ढोल बडवणारे मात्र संचालक व इतराना विश्वासात न घेता संस्थेचे सभासद कसे वाढले.? हे मात्र सांगणार नसल्याचा आरोप करत जनसेवा मंडळाच्या सर्व उमेदवाराना सभासद हे मोठ्या मताधिक्याने विजयी करत या निवडणूकीत सत्ताधाऱ्याना धडा शिकवतील असा विश्वास रंभाजी पाटील इलग यानी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे.

दरम्यान शुक्रवारी प्रचाराचा तोफा म्यान झाल्या असून रविवारी होणाऱ्या मतदानाकडे आता आश्वीसह पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !