◻️आम्ही संस्था विस्ताराबरोबर लोकाचा विश्वास संपादन केल्यामुळे निवडणूक काळात संस्थेच्या ठेवी ५० लाखानी वाढल्या
◻️ग्राहकाना आरटीजेएस, एनफडी एकाचं छताखाली उपलब्ध होणार
◻️पतंस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्याबरोबरचं ‘अँग्री सीसी’ करण्याचा संचालक मंडळाचा मानस
◻️कर्जदारासाठी १६ टक्याचा व्याजदर १३ टक्यावर आणला तर ठेवीचा व्याजदर ९ टक्क्यापर्यत वाढवला
◻️जेष्ठ नागरीक व सैनिकासाठी ९.५० टक्के व्याज
संगमनेर Live (संजय गायकवाड) | आरोप - प्रत्यारोपात आम्हाला रस नसून सभासदा बरोबरचं बँकेचे हित कशात आहेत ते पाहणे आमचा उद्देश आहे. विरोधक केवळ आरोप करण्याचे काम करत असले तरी येणाऱ्या काळात संस्थेची कोअर बँकीगं सेवा सुरु करून त्याचा क्यूआर कोड दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाना आरटीजेएस, एनफडी एकाचं छताखाली उपलब्ध करण्याचा जनसेवा विकास मंडळाचा मानस असल्याने रोप लावल.. म्हणाऱ्यानी संस्था जोपासली का.? हा सवाल संपतराव सांगळे यानी विरोधकाना विचारला आहे.
जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या अश्विनी ग्रामीण पतंस्थेच्या २०२२ - २७ या पंचवार्षिक निवडणूकीच्या प्रचाराच्या सांगता सभेत मार्गदर्शन करताना मेजर संपतराव सांगळे बोलत होते. यावेळी सांगता सभेच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हापरिषद सदंस्या अँड. रोहिनीताई निघुते होत्या. जेष्ठ नेते अँड. शाळीग्राम होडगर, विनायकराव बालोटे, बाळासाहेब भवर, डॉ. दिनकर गायकवाड, गुलाबराव सांगळे, बाळासाहेब मांढरे, संजय गांधी, भगवानराव इलग, म्हाळू गायकवाड, भारतराव गिते, भागंवतराव उंबरकर, जहूरभाई शेख, सुनील मांढरे, प्रदीप वाल्हेकर आदिसह उमेदवार व सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
यावेळी संपतराव सांगळे पुढे म्हणाले की, उंबरी बाळापूर येथे आपल्या संस्थेची एक शाखा होती. ती बंद पडलेली संस्था लवकरचं आम्ही पुन्हा सुरु करणार आहोत. संस्थेच्या कर्मचाऱ्याचे पगार अतिशय कमी होते. आमचे संचालक मंडळ आल्यानतंर महागाईच्या मानाने आमच्यां संचालक मंडळाने कर्मचाऱ्याच्या पगारात वाढ केली. संस्थेचा शाखा विस्तार करताना शाखा ऑनलाइन पद्धतीने जोडून सर्व व्यवहारात पारदर्शकता आणली.
आम्ही संस्था विस्ताराबरोबर लोकाचा विश्वास संपादन केल्यामुळे निवडणूक काळात संस्थेचे ठेवी ५० लाखानी वाढल्याचे संपतराव सांगळे यानी सागून कर्जदारासाठी १६ टक्याचा असलेला व्याजदर १३ टक्यावर आणला तर ठेवीचा व्याजदर ९ टक्क्यापर्यत वाढवला तसेच जेष्ठ नागरीक व सैनिकासाठी ९.५० टक्के व्याज देत असल्याची माहिती देऊन विरोधकाच्या अपप्रचाराला भुलु नका असे म्हटले आहे.
मागील तीन महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीची मोठी हानी झाली. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून दूध धंद्याला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याने शेतकरी समृध्द होणार आहे. आश्विनी पतंस्थेच्या माध्यमातून कर्ज पुरवठ्याबरोबरचं ‘अँग्री सीसी’ करण्याचा संचालक मंडळाचा मानस असून कागद पत्राच्या पुर्तेनतंर लाख ते दीड लाख कर्ज शेतकऱ्याना उपलब्ध करुन देणार असल्याचे संपतराव सांगळे यानी सांगितले.
संस्थेचा कारभार स्वच्छ असल्याने शासनाचा ‘दिपस्तंभ पुरस्कार’ आपल्या संस्थेला मिळाला असून आमच्याचं काळात शाखेला आयएसओ मानंकन देखील मिळाले आहे. त्यामुळे संस्थेकडे बघन्याचा लोकाचा दृष्टिकोण बदला आहे. हे सर्व केवळ सभासदामुळे आम्ही शक्य करु शकलो.
संस्थेचे सभासद आम्ही रद्द केल्याचा आरोप आमच्यावर केला जातो. परंतू मुल्याकन वाढल्यामुळे त्या सभासदाना आपण तुमचा शेअर पुर्ण करुन घेण्याची विनंती केली होती. पण त्यानी लक्ष न दिल्यामुळे त्याचे सभासदत्व रद्द झाले. त्यामुळे कोणत्याही बनवाबनवीला न फसता संस्थेच्या हितासाठी रात्र दिवस काम करणारे जनसेवा विकास मंडळाचे संचालक मंडळ सभासदानी निवडून द्यावे. असे आवाहन मेजर संपतराव सांगळे यानी केले आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते अँड. शाळीग्राम होडगर, अँड. रोहिनीताई निघुते, संजय गांधी, गुलाबराव सांगळे, भगवानराव इलग, भारतराव गिते यानी जनसेवा विकास मंडळाच्या सर्व उमेदवाराना निवडून देण्याचे आवाहन केले.
दरम्यान याप्रसंगी मेजर संपतराव सांगळे यानी विरोधकावर कोणतीही टिका करण्याऐवजी सर्व भाषण केवळ आपल्या संचालक मंडळाची सत्ता आल्यावर जनसेवा विकास मंडळाचे संचालक मंडळ काय नवे प्रयोग व सुविधा उपलब्ध करुन देणार यासबंधी माहिती दिल्यामुळे व्यासपीठासह उपस्थित सभासदानी टाळ्याचा कडकडाडाट करत प्रचार सभेची सांगता केली आहे.