◻️ काँग्रेस नेते आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली बँकेने बिनविरोधाची परंपरा जपली
संगमनेर Live | राज्यातील सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असलेल्या व तालुक्यातील सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक विकासाची कामधेनू असणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची २०२२-२७ ची निवडणूक काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँकेने अत्यंत काटकसर, पारदर्शकता व आधुनिकतेतून गौरवास्पद वाटचाल केली आहे. बँकेचे कामकाज पूर्ण संगणकीकृत असून बँकेला सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळाला आहे. सभासद व शेतकऱ्यांचा मोठा विश्वास या बँकेवर असून तळेगाव, साकुर, घारगाव सह संगमनेर मध्ये विविध शाखा आहेत. अत्याधुनिक प्रणालीने कार्यरत असलेल्या या बँकेने आपली बिनविरोधाची परंपरा याही वेळेसही जपली आहे.
पंचवार्षिक २०२२-२७ च्या या नवीन संचालक मंडळात ॲड. नानासाहेब गंगाधर शिंदे, शांताराम बाबुराव फड, श्रीकांत कैलास गिरी, अण्णासाहेब बाबुराव शिंदे, संजय निवृत्ती थोरात, ॲड. लक्ष्मण गजानन खेमनर, किसन बबन वाळके, बाबुराव काशिनाथ गुंजाळ, किसन रमाजी सुपेकर, सुधाकर माधवराव जोशी, अविनाश कचेश्वर सोनवणे, विवेक भाऊसाहेब धुमाळ, शिवाजी रतन जगताप, श्रीमती ललिताताई विजय दिघे, सौ. कमल पुंजाराम मंडलीक, राजेंद्र जानकीराम काजळे, कचरू जयराम फड यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सर्जेराव कांदळकर तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून योगेश कापसे व मॅनेजर रमेश थोरात यांनी काम पाहिले.
दरम्यान या नवीन संचालक मंडळाच्या निवडीचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ सुधीर तांबे, बाजीराव पा. खेमनर, ॲड. माधवराव कानवडे, सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख ,सत्यजित तांबे, बाबासाहेब ओहोळ ,इंद्रजीत थोरात, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, मावळते अध्यक्ष अमित पंडित, उपाध्यक्ष दत्तू खुळे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, लक्ष्मणराव कुटे, प्रतीत यश उद्योजक राजेश मालपाणी आदींनी अभिनंदन केले आहे.