◻️ रंगलेल्या मानाची कुस्तीने फेडले उपस्थिताच्या डोळ्याचे पारणे
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील खळी येथिल ग्रामदैवत शनिश्वर महाराज यांचा यात्राउत्सव नुकतांच उत्सहात पार पडला असून यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्त्याच्या हंगाम्यात रंगलेली मानाची कुस्ती उपस्थिताच्या डोळ्याचे पारणे फेडणारी झाल्याची चर्चा पचंक्रोशीत रंगली आहे.
ग्रामदैवत शनिश्वर महाराज यांचा यात्राउत्सव नुकतांच उत्सहात संपन्न झाला. यावेळी कै. लहानभाऊ देवराम सातपुते यांच्या स्मरणार्थ गणेश सातपुते व बाळासाहेब सातपुते यांनी ग्रामस्थाच्या सहकाऱ्याने भरवलेल्या कुस्त्याच्या हंगाम्यामध्ये खळीचे पैलवान अजित सोपान आंधळे व प्रतिस्पर्धी पैलवान यांच्यात मानाची कुस्ती पार पडली.
उपस्थिताच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या झालेल्या जंगी कुस्तीत खळीचे अजित आंधळे यांनी विजयी डाव टाकत बाजी मारली. त्यामुळे गावातील यात्रा कमिटी, तरुण युवक शनेश्वर मित्र मंडळ, भगवान बाबा मित्र मंडळ, उंब्रेश्वर मित्र मंडळाचे सदंस्य तसेच पंचक्रोशीतून आलेल्या कुस्तीपटू व ग्रामस्थानी दोन्ही पैलवानाचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी राजेद्रं चकोर, सुरेश नागरे, रमेश सानप, ज्ञानदेव लबडे, सचिन आव्हाड, हौशीराम नागरे, पांडुरंग वाघमारे, भाऊसाहेब नागरे, भानुदास उगलमुगले, लक्ष्मण उगलमुगले, गोरख घुगे, सोमनाथ सानप, सुनील सानप, गणेश पालवे, शिवाजी वाघमारे, सतीश वाघमारे, सोमनाथ नागरे, दिगंबर लोहाळे, बाबासाहेब आंधळे, रावसाहेब घुगे, तुकाराम नागरे, लक्ष्मण बर्डे, अर्जुन गवळी, सोपान आंधळे, सुभाष कांगणे, दिनकर उगलमुगले, एकनाथ नागरे, नवनाथ नागरे, रमेश नागरे, योगेश सानप, सतीष शिदें व पंचक्रोशीतून आलेले भाविक, नामांकित मल्ल व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.