◻️ पहिल्याचं प्रयत्नात लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळाल्यामुळे पंचक्रोशीतून अभिनदंनाचा वर्षाव
संगमनेर Live | आई - वडिलाचे आशिर्वाद, अंगी जिद्द, ध्येय व चिकाटी ठेवल्यास जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ही गोष्ट मनावर ठाम पणे बिबवल्यामुळे माजी सैनिक सचिन भास्कर शिदें यानी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवून सहाय्यक विक्रीकर अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे त्याचे व संपूर्ण शिदें कुटुंबियाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सचिन भास्कर शिदें हे संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथिल रहिवासी असून शेतकरी भास्कंर विष्णू शिदें यांचे सुपुत्र आहेत. शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाल्यामुळे कष्ट करण्याचे बाळकडू त्याना लहानपणी घरातूनचं मिळाले. त्याचे प्राथमिक शिक्षण मनोली जिल्हापरिषद शाळा तसेच भाडूंप (मुबंई) याठिकाणी झाले. त्यानी माध्यमिक शिक्षण रहिमपूर येथिल भिमाजी अंबुजी शिदें विद्यालयात घेतले. उच्च शिक्षण संगमनेर येथिल ज्ञानमाता विद्यालय, आश्वी खुर्द येथिल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत तसेच बीए ची पदवी त्यानी यशंवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून मिळवली आहे.
वयाच्या १७ व्या वर्षीचं म्हणजे सप्टेंबर २००३ मध्ये सचिन शिदें हे भारतीय सैन्य दलात हेड क्लार्क म्हणून दाखल झाले. या १५ वर्षाच्या कालखंडात त्यानी बंगलोर, नवी दिल्ली, जम्मू, श्रीनगर, पंजाब, पठाणकोट, गया (बिहार), उधमपूर, पुणे याठिकाणी कर्तव्य बजावले. जून २०१९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले होते.
सचिन शिदें यानी सैन्यदलातून निवृत्त झाल्यानतंर एमपीएससी चा अभ्यास सुरु केला. यासाठी त्याना शिक्षक मनीष जोंधळे यांचे मार्गदर्शन लाभले. २०२१ मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा दिली होती. तिचा निकाल नुकताचं जाहिर झाला असून त्यामध्ये त्यानी सहाय्यक विक्रीकर अधिकारी पदाला गवसणी घातल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान सचिन शिदें यांचे लहान बंधू योगेश भास्कंर शिदे हे पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर उस्मानाबाद जिल्हात कार्यरत आहेत. त्यामुळे शिदें कुटुंबातील दोन्ही मुलानी देशसेवेसाठी स्वंता:ला वाहून घेतल्यामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.