धक्कादायक.. तरस सदृष्य प्राण्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

संगमनेर Live
0
◻️ पिप्रीं - लौकी अजमपूर शिवारातील घटनेने पंचक्रोशीत दहशत

◻️ संगमनेर Live ने दिला होता ८ दिवसापूर्वीचं सावध राहण्याचा इशारा.!

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लौकी अजमपूर शिवारात रविवारी रात्री शेतकरी रामदास विठ्ठल गिते (वय - ३६) यांच्यावर तरस सदृष्य प्राण्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी उजेडात आली असून ८ दिवसापूर्वीचं शेतकऱ्याना सावधान राहण्याबाबतचा इशारा संगमनेर Live ने ‘सावधान.. प्रतापपूर शिवारात तरसाचा वावर’ या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध करुन दिला होता. त्यानतंर घडलेल्या घटनेनतंर परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  पिप्रीं - लौकी अजमपूर शिवारात शेतकरी रामदास विठ्ठल गिते याची शेती व राहते घर आहे. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ते आपल्या घरासमोरील पडवीत गाढ झोपलेले होते. यावेळी त्याच्यावर तरस सदृष्य प्राण्याने हल्ला केला. जोर-जोरात गिते यानी आरडाओरड केल्यामुळे त्या हिस्र प्राण्याने तेथून पळ काढला. त्यामुळे त्याच्यां हातासह इतरत गभिरं दुखापत झाली होती.

त्यामुळे तात्काळ उपचारासाठी त्याना प्रवरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केल्यानतंर कुटुंबीयानी त्याना पुढील उपचारासाठी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते भारतराव गिते यानी राज्याचे महसूलमंत्री ना. विखे पाटील याना फोनवरुन कळवताचं विखे पाटील यानी सिव्हिल रुग्णालयात फोन करुन जखमी रामदास गिते यांच्या तब्बेतीची विचारपूस केली असल्याचे भारतराव गिते यानी सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताचं सकाळी उपसरपंच दौलत दातीर, ग्रामपंचायत सदंस्य बाजीराव गिते, मनीषा अशोकराव गिते, राजू पिजांरी, सुभाष मुंढे, भाऊसाहेब वाघे, शरद बिडवे, गोरक्षनाथ वाघे, गजानन घुगे, एकनाथ गिते, सोमनाथ गिते, मनोज खेडकर, आदिनाथ मुंढे आदिनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत गिते याना मदतीचे आवाहन केले आहे.

दरम्यान मागील आठवड्यातचं संगमनेर Live ने ‘सावधान.. प्रतापपूर शिवारात तरसाचा वावर’ या आशयाखाली वृत्त प्रसिद्ध करुन नागरीकाना सावध राहण्याचा इशारा दिला होता. बिबट्याच्या दहशतीनतंर तरस सदृष्य प्राण्याच्या वावरामुळे मोठे संकट परिसरातील नागरीकापुढे उभे ठाकल्याने भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र असल्याने वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थानी केली आहे.

मागील अनेक वर्षापासून बिबट्याचा वावर परिसरात असल्याने शेतकऱ्याना जीव मुठीथ धरुन शेतीची कामे करावी लागत आहे. अशातचं तरसासारख्या हिस्रं प्राण्याच्या हल्ल्यामुळे नागरीक दहशतीखाली असून रात्री अपरात्री शेतातील उभ्या पिकाला पाणी कसे द्याचे.? असा मोठा प्रश्नं निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्याच्या वीजपंपाला दिवसा वीज पुरवठा केल्यास शेतकऱ्याना मदत होईल. तसेच जखमी गिते हे गरीब असल्याने त्याना प्रशासनाने मदत करणे गरजेचे असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते भारतराव गिते यानी केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !