◻️ आमदार थोरात व आमदार डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात भव्य अश्वारूढ पुतळा साकारणार - सोमेश्वर दिवटे
◻️ भाजपच्या भूलथापांना संगमनेरकर बळी पडणार नाही
संगमनेर Live | काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे विकासातून वैभवशाली ठरलेले शहर आहे. सौ. दुर्गाताई तांबे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळातच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून जागेचेही नियोजन केले आहे.
लवकरच शहरात भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून या अश्वारूढ पुतळ्याबाबत भाजपचे पदाधिकारी हे जनतेला भुलथापा देऊन दिशाभूल करण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे.
अश्वारूढ पुतळ्या बाबत बोलताना शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष श्रीराम गणपुले आणि सय्यद जावेदभाई जहागिरदार यांनी आम्हाला सत्ता दिल्यास आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पूर्णकृती पुतळा उभारू असे सांगितले.
खरे पाहिले तर ॲड. गणपुले आणि जावेद भाई जहागीरदार या दोघांनाही नागरिकांनी नगरसेवक म्हणून सत्ता दिली होती. भाजपचे नगरसेवक असतांनी राज्यात भारतीय जनता पार्टीचेचं सरकार होते. तरी सुद्धा अँड. गणपुलेंना म्हाळुंगी नदीवर साधा एक पूल सुद्धा उभा करता आला नाही, कि निवडून आलेल्या प्रभागात साईनगर मध्ये एकही काम केल नाही. साईनगरमध्ये नागरिकांना विचारा की गणपुले नगरसेवक असताना तुमच्याकडे फिरकले होते का.?
जावेदभाई जहागिरदार यांनी तर प्रत्येक वेळी वेग - वेगळा वार्ड निवडला. त्यांनी चांगले काम केले नसल्यामुळे नागरिकांनी त्यांना दोनदा पराभूत केले. जर त्यांचे काम चांगले असते तर त्यांना असे नाकारले नसते. या याउलट आपल्या कामामुळे मा. नगराध्यक्ष दिलीपशेठ पुंड त्यांच्या प्रभागातून पाच वेळा निवडून आले. एकदा तर नागरिकांनी त्यांना बिनविरोध नगरसेवक केले. तेव्हा कामांबाबत भाजपने थापा मारू नये.
या शहरात आ. डॉ. सुधीर तांबे हे नगराध्यक्ष असतांना काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले, लालबहादूर शास्त्री, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची उभारणी केलेली आहे. कितीतरी जागेवरून वाद होत होते. ते वाद त्यांनी मिटवुन पुतळ्याची उभारणी करण्यात आली. मात्र याबाबत प्रसिद्धी केली नाही. कोणत्याही कारणाने भूलथापा मारण्याची भाजपची पद्धत आहे.
अँड. गणपुले व जावेदभाई लोकांना भुलथापा देऊन फसवू शकत नाही. लोकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून पाहिलेले आहे. नगरसेवक म्हणून तुमचे कर्तुत्व पाहिलेले आहे. जावेदभाई आपले कर्तृत्व पाहिलेले आहे. काँग्रेस पक्षाच्या बळावर उपनगराध्यक्ष झालेला असताना काँग्रेस पक्षाशी गद्दारी करून लोकांच्या पुढे आता तुम्ही येत आहेत. येथील जनतेला गद्दारी मान्य नाही. लोक तुम्हा दोघांनाही चांगले ओळखतात व लोकांनाही आपले कर्तृत्वही चांगले माहित आहे. नागरिक आपल्या भूलथापांना बळी पडणार नाही.
तत्कालीन काँगेसच्या नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे व नगरसेवकांनी त्यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासाठी नगरपरिषदेच्या आर्थिक बजेट मध्ये निधी पन्नास लाख इतका त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून ठेवला आहे व जागेचेही नियोजन केले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखालीच उभारला जाणार आहे. तरी अँड. गणपुले आणि जावेदभाई जहागिरदार आणि भाजपच्या भूलथापांना संगमनेरकर कधीही बळी पडणार नाही असेही ते म्हणाले.