संगमनेर Live | मुबंई येथिल प्रितगंध फाऊंडेशन संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनी संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथिल रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक डॉ. अनिल सांगळे यानां ‘कार्यसम्राट’ हा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवराच्या हस्तें प्रदान करण्यात आला आहे. डॉ. अनिल सांगळे हे कामानिमित्त मुबंई येथे वास्तव्यास आहेत.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर तसेच प्रमुख पाहुणे एलीट मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड आणि मिसेस इंडिया युनिव्हर्स विजेत्या डाॅ. सोनाली वनमाळी, कवयित्री, शिक्षणतज्ञ, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट डाॅ. अलका नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष तावडे, इतिहास संशोधक डॉ. शीतलताई मालुसरे आदि मान्यवर उपस्थित होते.
देशातील शास्रज्ञ, लेखक, राष्ट्रीय समाज भूषण तथा मार्गदर्शक अशा सर्वांगीन सर्वोत्कृष्ठ समाजकार्यात अमुल्य व अतुलनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तीनां हा अतिशय प्रतिष्ठीत समजला जाणारा ‘कार्यसम्राट पुरस्कार’ देण्यात येत असतो. यामध्ये सन्मानपत्र, शाल व
सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
याप्रसंगी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अनिल सांगळे म्हणाले की, भारत भूमीचे आम्ही सदैव ऋणी आहोत. प्रितगंध फाऊंडेशन भविष्यात नक्कीच जग पातळीवर काम करेल व नावलौकीकास येईल. आम्ही समाजाची निस्वार्थपणे केलेली सेवा आज फळास आल्यामुळेचं आम्हाला हा पुरस्कांर मिळाल्याचे भाग्य प्राप्त झाल्याच्या भावना त्यानी व्यक्त केल्या आहेत.
यावेळी त्यांनी कवयित्री सौ. सुरेखाताई प्रकाश शिरसाठ (पुणे) यांचा सन्मान सुद्धा स्विकारला असून यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते. दरम्यान डॉ. सांगळे याना ‘कार्यसम्राट’ हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.