◻️ ओझर खुर्द शिवारातील घटनेने पंचक्रोशीत शोककळा
◻️ टँक्टर चालकानो काळजी घ्या.!
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द शिवारात शेतीची मशागत सुरु असताना टँक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये गुतंलेला चिखल काढण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या आंगावर रोटाव्हेटर पडल्यामुळे त्याचा यामध्ये दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ओझर खुर्द शिवारातील दत्तमंदिर परिसरात पुंजा धोडींबा शिदें (वय - ३९) हा तरुण टँक्टरच्या साहय्याने शेतीची मशागत करत होता. यावेळी रोटाव्हेटर मध्ये चिखल गुंतल्यामुळे टँक्टर उताराला लावून तो रोटाव्हेटरचा चिखल काढत होता. यावेळी टँक्टर सरकल्याने रोटाव्हेटर थेट त्यांच्या छाती व पोटावर पडला.
यावेळी स्थानिकानी पाहिले असता त्याठिकाणी धाव घेतली. इतर स्थानिक नागरीकाच्या मदतीने पुंजा शिदें याना संगमनेर येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतू उपचारापुर्वीचं त्याचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरानी दिली.
दरम्यान मयत पुंजा शिदें यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई, एक भाऊ, एक बहिण असा मोठा परिवार असून त्याची घरची परिस्थिती गरीबीची असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्यां निधनाची वार्ता गावासह पंचक्रोशीत पसरातचं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.