◻️ ‘पुढील वर्षी वारीला जाणार, यंदा मात्र राहुल गांधीबरोबरचं चालणार.!’
संगमनेर Live | खा. राहुल गांधी याची कन्याकुमारी ते जम्मू कश्मिर यात्रा सध्या महाराष्ट्र जात असून तिला मिळणार प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कारण कोणताही स्वार्थ उराशी न बाळगता स्व खर्चाने स्वतःची चटणी भाकर घेऊन हजारो नव्हे लाखो नागरीक या यात्रेच्या निमित्ताने सहभागी होऊन चालत आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल लक्ष्मण तथा मुकेश सदाशिव वाल्हेकर हा गांधी घराण्यावर प्रेम करणाऱ्या तरुणाचा देखिल समावेश असून त्याचा विडोओ सोशल मिडियात तुफान वायरल झाल्यामुळे हा सारा लेख प्रपंच..
प्रचंड आत्मविश्वास, धैर्य, त्याग आणि समर्पणाची तयारी ठेवून राहुल गांधी यानी वयाच्या ५२ व्या वर्षात प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास सुरु केलाय. मागील काही वर्षांत सातत्याने टीकेचं लक्ष्य ठरणाऱ्या राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रा’ या एका निर्णयामुळे त्यांची प्रतिमा बदलायला सुरुवात झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. देशातल्या सर्वात जुन्या राजकीय पक्षांपैकी महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसचे तडफदार नेते म्हणून राहुल गांधी ओळख निर्माण होण्यास यानिमित्त सुरवात झाली म्हणटल्यासं वावगं ठरणार नाही. देशातल्या वाढत्या असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर देशात एकता निर्माण करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढण्यात येत असल्याचं काँग्रेसच्यावतीने प्रत्येक सभेत सांगण्यात येत आहे.
तमिळनाडूतल्या कन्याकुमारीपासून सुरू झालेली ही यात्रा जम्मू-काश्मीर राज्यातल्या श्रीनगरमध्ये संपणार आहे. ही यात्रा १२ राज्यांमधून जाणार आहे. त्यात राहुल गांधी जवळपास ३,५७० किमी अंतर पायी चालणार आहेत. ही यात्रा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे १५० दिवस लागतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
देशातल्या नागरिकांमध्ये धर्म आणि जातींच्या नावाखाली मतभेद निर्माण करून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसकडून केंद्र सरकारवर वारंवार केला जात आहे. नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, त्यांच्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक भान निर्माण व्हावं हा या यात्रेचा हेतू असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. महागाई, बेरोजगारी आणि द्वेषाच्या राजकारणाविरोधात भारत जोडो यात्रा सुरू केली असल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे. भारत आपल्या सगळ्यांचा आहे, त्यामुळे भारत जोडो यात्राही आपली सगळ्यांची असल्याचं सांगून या यात्रेत सर्वसामान्यांनाही सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यानुसार बहुसंख्य नागरिक या यात्रेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये सहभागी होत आहेत.
दौऱ्याच्या ६१ व्या दिवशी म्हणजे ७ नोव्हेंबर रोजी ही यात्रा तेलंगण राज्यातून महाराष्ट्रात दाखल झाली. महाराष्ट्रातल्या १८ दिवसांच्या दौऱ्यात राहुल गांधींची पाच जिल्ह्यांमध्ये पदयात्रा आहे. याचंकाळात पंढरपूर येथे वारीसाठी चाललेल्या आश्वी खुर्द येथील मुकेश वाल्हेकर या तरुणाला यात्रेची माहिती मिळाली. तीन पिढ्यापासून वाल्हेकर कुटुंबीयाचे गांधी घराण्यावर अपार प्रेम आहे. त्यामुळे वारीसाठी निघालेला मुकेश थेट राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाला असून ‘पुढील वर्षी वारीला जाणार, यदां मात्र राहुल गांधी बरोबर चालणार.!’ असा संदेश देत स्वखर्चातून भारत जोडो यात्रेत सहभागी झाला आहे.
नुकतांच सोशलमिडीयावर त्याचा ‘भारत जोडो यात्रेतील एक विडिओ तुफान वायरल होत असल्याने एके काळी देशातला सर्वांत मोठा आणि सर्वांत जास्त काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाला गेली काही वर्ष मरगळ असे सर्वसामान्य मानसे जोडली जात असल्याने बाजूला होण्यास मोठी मदत होणार असून सातत्याने होणारे पराभव, चांगल्या नेतृत्वाचा अभाव, दुसऱ्या फळीतल्या तरुण नेतृत्वाची कमतरता, अंतर्गत मतभेद, बंडाळी यामुळे पक्ष ग्रासलेला आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांची स्वतःची प्रतिमा तर बदलत आहेच, पण काँग्रेस पक्षालाही नवसंजीवनी मिळेल अशी आशा व्यक्त करण्यास हरकत नाही.
मुकेश वाल्हेकर कोण आहेत.?
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल मुकेश वाल्हेकर हे पंचक्रोशीत मातृभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी या वाल्हेकर कुटुंबाची नाळ जोडलेली असून प्रतिवर्षी वारीला पायी जाणे, गावासह पंचक्रोशीतील धार्मिक कार्यात सहभागी होऊन पडेल ते काम करत असल्याने सर्वत्र त्याचा मोठा आदर आहे. सर्व सामान्य कुटुंबात जन्माला आलेले हाळीपाटी व मोलमजुंरी करुन उदरनिर्वाह करत असलेले मुकेश वाल्हेकर मात्र ‘भारत जोडो’ यात्रेमुळे चागलेचं चर्चेत आले आहे.