◻️ दैव बलवत्तर म्हणून चौघानवरील विघ्न टळले
◻️ शेतकऱ्याना शेतात जाण्याची वाटतेय भिती
◻️ रात्री अपरात्री बाहेर पडणारे बिबटे झालेत आता उदडं
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी सह परिसरातील गावानमध्ये बिबट्या हा सरास नजरेस पडत असला तरी मागील काही दिवसामध्ये माणसावरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशातचं शिबलापूर परिसरात नुकताचं रोहित आण्णासाहेब नागरे यांच्या नजरेस एक पुर्ण वाढ झालेला बिबट्या पडला असून त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या दोन चिमुकले मुले व वृध्द महिलेची भितीने चागलीचं भबेरी उडाली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि. १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास रोहित आण्णासाहेब नागरे हे आश्वी वरून येत असताना त्याच्या गाडीसमोर आणि ज्ञानदेव गंगाराम नागरे यांच्या घरापासून दीडशे ते दोनशे फुट अंतरावरील रस्त्यावर पुर्ण वाढ झालेला एक बिबट्या १० ते १५ मिनिटे उभा होता.
यावेळी रोहित बरोबर त्याची ३ वर्षाची चुलत बहीण धनश्री, ५ वर्षांचा चुलत भाऊ प्रथमेश व आजी यमुना ज्ञानदेव नागरे हे देखील होते. तसेच त्यापासून ५० फुट अंतरावर प्रवीण ज्ञानदेव नागरे हा तरुण गायांसाठी चारा काढत होता. त्याला तर कल्पनाही नव्हती कि त्याच्यापासून ५० फुट अंतरावर बऱ्याच वेळापासून बिबट्या उभा आहे. ज्याने त्याच्यावर कधीहीं हल्ला केला असता. दैव बलवत्तर म्हणून कोणताही अघटित प्रसंग त्याच्यावर ओढावला नाही.
दरम्यान दिवाळीच्या आदल्यादिवशी दुपारी १ वाजता नागरे कुटुंबियांच्या जवळच राहणाऱ्या अर्जुन गणपत गिते यांचा बोकड बिबट्याने ठार करुन उचलून उसात घेऊन गेला होता. त्यामुळे अशाप्रकारे दिवसाढवळ्या बिबट्या आजूबाजूला वावरत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे यावर वनविभागाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत.