◻️ “ना खाऊगा, ना किसी को खाने दुगा।” - मेजर संपतराव सांगळे
◻️ जनसेवा विकास मंडळाकडून आश्वी येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुंभारभ
संगमनेर Live (संजय गायकवाड) | संगमनेर तालुक्यात शेकडो पतसंस्था आल्या व गेल्या. परंतु योग्य नियोजन, पारदर्शक व स्वच्छ कारभारामुळेचं अश्विनी पतसंस्थेने सभासदासह जनमानसात एक चागली प्रतिमा निर्माण केली आहे. संस्थेचे विद्यमान चेअरमन हे भारतीय सैन्यदलातील सेवानिवृत्त सैनिक असल्यामुळे सैन्यातील शिस्त ही त्याच्या अंगी आहे. त्यामुळेचं सुज्ञ संचालकाच्या मदतीने त्यानी २ कोटीच्या ठेवी १६ कोटीपर्यत वाढवल्या.
आश्वी बाजारपेठेतील व्यापारी व परिसरातील जेष्ठ कार्यकर्त्याशी चर्चा करुनचं सत्ताधारी जनसेवा विकास मंडळाला पाठीबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभासदानी सत्ताधारी संचालक मंडळाच्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम पणे उभे रहावे. असे आवाहन जेष्ठ नेते अँड. शाळीग्राम होडगर यानी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूकीनिमित्त आश्वी येथे आयोजित प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमप्रसंगी सभासदाना मार्गदर्शन करताना अँड. शाळीग्राम होडगर बोलत होते.
याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक गुलाबराव सांगळे, अशोकराव म्हसे, डॉ. दिनकर गायकवाड, माधवराव गायकवाड, विनायकराव बालोटे, सुमतीलाल गांधी, संजय गांधी, भगवानराव इलग, रामभाऊ भुसाळ, बाळासाहेब मांढरे, जेऊरभाई शेख, अकुंशराव कांगणे, माधवराव भोसले, भारत गिते, म्हाळू गायकवाड, शिवाजी मांढरे, दिनकर आंधळे, गजानन आव्हाड, रामदास दातीर, मकरंद गुणे, सौ. कांचनताई मांढरे, सीताराम गिते, सुरेश नागरे, शंकर नागरे, श्रीहरी नागरे, विलास कुलकर्णी, हिराबाई नागरे, सोन्याबापू सांगळे, भिमाजी बोद्रें, राजेद्रं नागरे, विकास बोद्रें, सचिन बोद्रें, एकनाथ नागरे, भागवत उंबरकर, जगन्नाथ मुन्तोडे, नारायण कहार, सतिष जोशी, रावसाहेब घुगे, सदाशिव घुगे, संदीप घुगे, तात्याबा डोगंरे, भागाभाऊ आंधळे, सुखदेव आंधळे, बाळासाहेब सांगळे, गोवर्धन सोनवणे, मधुकर सोनवणे, भाऊसाहेब सांगळे, सुभाष नागरे याच्यांसह जनसेवा विकास मंडळाचे सर्व उमेदवार व परिसरातील गावातून आलेले संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जेष्ठ नेते अँड. शाळीग्राम होडगर पुढे म्हणाले की, सत्ताधारी मंडळाने विचारपूर्वक विविध क्षेत्रातील अनुभवी व कर्तबगार व्यक्तीना उमेदवारी दिली आहे. संस्थेने पारदर्शक व्यवहाराच्या माध्यमातून संस्था चागल्या प्रकारे चालवून सभासदाचा विश्वास संपादन केला आहे. संपतराव सागळे हे माजी सैनिक असल्याने ते संस्थेला यशाच्या शिखरावर नेतील यांचा आम्हाला विश्वास असल्यामुळेचं आम्ही सत्ताधाऱ्याच्या पाठीशी उभे आहोत.
संस्थेचे सर्वसामान्य पुरुष व महिला यांना बचतगटाच्या माध्यमातून अर्थपुरवठा करण्याचे धोरण हे कौतुकास्पद असल्याचे गौरोउद्गार अँड. होडगर यानी काढून संस्थेच्या ठेवी, कर्जवितरण, नाममात्र थकबाकी करुन संस्था नफ्यात आणणे हे केवळ संचालक मंडळाच्या स्वच्छ कारभारामुळे शक्य झाले असल्याचे म्हणत विजय आपलाचं होणार असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली.
विनायकराव बालोटे म्हणाले की, मागील काळात संस्थेच्या संस्थापकाना सदैव आम्ही मोठी मदत केली. परंतू त्यानी संस्थेचे हित न पाहिल्यामुळे त्यांच्या काळात संस्था पुढे जाण्याऐवजी मागे आली. सध्याच्या सत्ताधारी मंडळीनी मागील १० वर्षाच्या कालखंडात पतसंस्था क्षेत्रात एक दिपस्तंभा प्रमाणे कामगिरी केल्यामुळे यशस्वी व आदर्शवत काम करत आहेत. त्यामुळेचं आम्ही चागल्या लोकाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेऊन एकमुखी पाठीबा देत असल्याचे सांगितले. याप्रसंगी जेष्ठ नेते भगवानराव इलग व रामभाऊ भुसाळ यानीही आपला पाठीबां असल्याचे जाहीर केले.
यावेळी संस्थेचे चेअरमन संपतराव सांगळे सभासदाना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मी माजी सैनिक असून मला ३१ एकर शेती आहे. त्यात १५ एकर ऊस गळीताला आहे. त्यामुळे मला सत्तेचा कोणताही मोह नाही. परंतू नाहक मला बदनाम करण्याचे काम विरोधकाकडून सुरु आहे. परंतू सभासदाना सर्वकाही माहित असल्यामुळे सभासद आमच्या पाठीशी आहेत. येत्या काळात संस्थेच्या माध्यमातून नवीन उद्योग व व्यावसायाला प्रोत्साहन देण्याबरोबरचं शेतकऱ्यासाठी विविध योजना आम्ही राबवणार आहोत.
मी माजी सैनिक असून शिस्त व नियोजनाला मी जास्त महत्त्व देत असल्यामुळे माझ्या कार्यकाळात प्रशिक्षण सोडता १ रुपयाचाही खर्च संचालक मंडळावर केला नाही. संस्थेच्या ८१ पैकी ८१ बैठकाना मी हजर होतो. सभासद व बँकेच्या ग्राहकाच्या विश्वासामुळेचं २ कोटीच्या ठेवी आमच्या कार्यकाळात १६ कोटीपर्यत वाढल्या. ही आमच्या कामाची पोहच पावती असल्याचे म्हणत आमच्या काळातचं संस्थेचा आश्वी खुर्द येथे शाखा विस्तार झाल्याचे म्हटले आहे.
यावेळी विरोधकाचे सर्व आरोप फेटाळून लावत “ना खाऊगा, ना किसी को खाने दुगा।” असे म्हणत संपतराव सांगळे यानी जनसेवा विकास मंडळाच्या सर्व उमेदवाराना भरघोस मतानी विजयी करा असे आवाहन सभासदाना करताना भविष्यात संस्थेच्या ठेवी दुप्पट करण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी जनसेवा विकास मंडळाचे उमेदवार विनित दिलीप गांधी, सखाहरी बाबुराव नागरे, तुळशीराम चांगदेव म्हस्के, भाऊसाहेब लक्ष्मण लावरे, वसंत धोडींबा वर्पे, संपत बाबुराव सांगळे, हरिभाऊ दत्तु ताजणे, भगवान गोधाजी खामकर, कल्पना गोवर्धन बोद्रें, पुष्पा बाळासाहेब भवर, राजेद्रं लहानु गिते याना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
advertisement