◻️ आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे घराच्या आवारात उभी असलेली मारुती सुझुकी कंपनीची झेन गाडी चोरट्यानी चोरुन नेल्याची घटना उजेडात आली असून लियाकत शफी शेख यानी याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी लियाकत शेख यानी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रांरीत म्हटले की, दि. ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ११ ते १ वाजेच्या दरम्यान घरासमोरील आवारात लावलेली मारुती सुझुकी कंपनीची झेन (एम. एच. २० एजी २९५४) गाडी अंदाजे किमंत ६० हजार रुपये ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. त्यामुळे आश्वी पोलीस ठाणे येथे गुरंव नबंर २११/२०२२ नुसार भादंवी कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये याच्यां मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आर. डी. पारधी हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.