◻️ जनसेवा मंडळाकडून आश्वी व शेडगाव येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुंभारभ
◻️ सत्ताधाऱ्याच्या कारभारावर वक्त्याकडून टिकास्त्रं
◻️ ५०० सभासद बेकायदेशीर रित्या कमी केले.? मुद्दा निवडणूक प्रचारात गाजणार
संगमनेर Live | नातेवाईक, जात व पक्ष न पाहता अश्विनी पंतसंस्थेच्या हितासाठी त्याकाळात घरोघर फिरुन ५० रुपये शेअर गोळा करत सभासद केले. संस्था वाढावी व टिकावी यासाठी मागील दोन पंचवार्षिक निवडणूका आम्ही बिनविरोध केल्या. परंतू संस्थेच्या सभासदाच्या जीवावर मोठे झालेले आज त्याचं संस्थेच्या मुळावरचं घाव घालण्याचा प्रकार निवडणूकीच्या माध्यमातून करत आहेत.
या संस्थेचे रोपटे आम्ही सर्वसामान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून लावले असून यासाठी जुन्या जाणत्या सभासदानी यासाठी कष्ट घेतले आहेत. त्यामुळे भविष्यात सत्ताधाऱ्याकडून संस्थेला मोठा धोका असल्याने अश्विनी पंतसंस्था वाचवण्यासाठी सर्वानी एकत्र या असे आवाहन संस्थेचे संस्थापक गंगाधर आंधळे यानी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूकीनिमित्त आश्वी येथे आयोजित प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या कार्यक्रमप्रसंगी सभासदाना मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक गंगाधर आंधळे बोलत होते. याप्रसंगी मुरलीधर आंधळे, रंभाजी इलग, भिमाशंकर आंधळे, भाऊसाहेब दादा फड, रंगनाथ आंधळे, भाऊसाहेब मुंढे, लक्ष्मण उगलमुगले, शाळीग्राम चंद, भिमराज बोद्रें, रामहारी रामचंद्र सांगळे यांच्यासह उमेदवार व पंचक्रोशीतून आलेले संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक गंगाधर आंधळे पुढे म्हणाले की, दिवगंत मा. खासदार पद्मभुषन बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून आतापर्यत विखे पाटील कुटुंबाने नेहमी संस्थेला मदत केली आहे. त्याकाळात आम्ही घरोघर फिरुन ५० रुपये शेअर घेऊन संस्थेसाठी सभासद केले. हे सभासद आमच्या पाठीशी असल्याची भिती सत्ताधाऱ्याना असल्याने त्यानी बेकायदेशीर रित्या त्याचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घातला. पाचशे ते हजार रुपये संस्थेत टाकण्यासाठी त्याकाळी लोक घाबरत होते. आज त्याचं संस्थेत विश्वास व नियोजनाच्या बळावर कोट्यावधी रुपयाच्या ठेवी ठेवण्यात आल्या आहेत.
आम्ही सत्तेच्या मोहापायी नव्हे तर, सभासदाच्या हितासाठी या निवडणूकीत उतरलो आहोत. कर्जदारांना १५ टक्के ऐवजी १३ टक्क्यानी कर्ज वाटप करण्याची मागणी तसेच कँश क्रेडीट सुरु करण्याची आमची असलेली सातत्याची मागणी सत्ताधाऱ्यानी धुडकावून लावली. त्याना निवडून येण्याची शाश्वती नसल्यामुळेचं घोगरगाव, नेवासे आदि ठिकाणी सभासद करण्याचा कुटील डाव सत्ताधारी यानी केल्याची घणाघाती टिका गंगाधर आंधळे यानी करुन संस्था टिकली किवां बुडाल्यास बाहेरच्या सभासदाना फरक पडणार नाही. परंतू आपली मातृसंस्था ढासळल्यास तुम्हाला व मला असह्य वेदना होणार आहेत. त्यामुळे सभासदचं या निवडणूकीत मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्याचे गर्वहरण करतील असे म्हटले आहे.
तसेच शेडगाव येथे मार्गदर्शन करताना रंभाजी पाटील इलग यानी सत्ताधारी गटाच्या कारभारावर ताशेरे ओढत संस्था स्थापन झाली तेव्हा तुम्ही कोठे होता.? हा सवाल उपस्थित करत स्वता:च्या फायद्यासाठी निवडणूक लादणाऱ्यानी पाच वर्षात संस्थेच्या हितासाठी नेमके काय केले यांचे उत्तर द्यावे असे म्हणत पँनल टृ पँनल जनसेवा मंडळाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान यावेळी जनसेवा मंडळाचे उमेदवार असलेले विलास मुरलीधर आंधळे, भिका पंढरीनाथ गिते, रघुनाथ गजाबा जाधव, कैलास किसन नागरे, हौशिराम बाबुराव फड, राजेद्रं बबन बोद्रें, रामदास पांडुरंग ताजणे, संपत देवजी कदम, लिला कैलास नागरे, वैशाली बबन शिदें व डॉ. भानुदास सखाराम आंधळे याना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
**advertisement