◻️ विषारी साप चावल्यामुळे अथवा विषबांधेमुळे किवां अन्न न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज
◻️ वनविभागाने तातडीने मृत बिबट्याला हालवले
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे बुधवारी सकाळी पुर्ण वाढ झालेला मृत बिबट्या आढळून आल्यामुळे एकचं खळबळ उडाली असून विषारी साप चावल्यामुळे अथवा विषबांधेमुळे किवां अन्न न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर माहिती मिळताचं वनविभागाने तातडीने या मृत बिबट्याचा मृतदेह हालवल्याचे स्थानिकानी सांगितले आहे.
आश्वी सह पंचक्रोशीत बिबट्यांचा मोठा वावर असल्यामुळे नियमित पशुधनासह माणसावर हल्ल्याच्या घटना घडत असता. नुकतीचं ऊस तोड मजुंराच्या चिमुकल्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात चिमुकल्याचे प्राण वाचले असले तरी परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.
बुधवार सकाळी यांच परिसरात काही अंतरावरावर प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या कोकजे वस्ती येथे भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चा सेलचे जिल्हा सचिव प्रशांत कोडोलीकर याच्या विहिरी जवळील शेतामध्ये पुर्ण वाढ झालेला मृत बिबट्या स्थानिक नागरीकाना बुधवारी आढळून आला होता. याबाबतची माहिती वनविभागाला मिळताचं त्यानी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन या मृत बिबट्याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान या बिबट्याचा मृत्यू कसा झाला याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकली नसली तरी विषारी साप चावल्यामुळे अथवा विषबांधेमुळे किवां अन्न न मिळाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येण्यात येत आहे. तर मृत बिबट्या हा २ वर्ष वयाचा मादी बिबट्या असल्याची माहिती मिळाली आहे.