◻️ जर्दा पुडीवर लिहून कर्ज मजूंर करणारे निवडून द्याचे का.?
◻️ ना. विखे पाटील यांचा पाठीबां नेमका कोणत्या गटाला.? भगवानराव इलग यांचा मोठा गौप्यस्फोट
संगमनेर Live (संजय गायकवाड) | सध्या आम्हीचं संस्थेचे संस्थापक म्हणणाऱ्याकडून निवडणूक प्रचारात पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे. आपल्याकडे पैसा नसला तरी स्वच्छं चारित्र्य आहे. त्यामुळे सभासद विरोधकाना मतदानाच्या माध्यमातून त्याची जागा दाखवून देतील. नाहक उमेदवार देऊन संस्थेवर निवडूक लादणाऱ्याना पराभवाची स्वप्न पडू लागल्याने आता त्यानी सुपारी पहिलवान भाषणाला आणून अपप्रचार सुरु केल्याची खरपूस टिका माजी पंचायत समिती सदंस्य व संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गुलाबराव सांगळे यानी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील अश्विनी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणूकीनिमित्त शेडगाव येथे आयोजित प्रचार सभेत मार्गदर्शन करताना गुलाबराव सांगळे बोलत होते.
यावेळी जेष्ठ नेते भगवानराव इलग, बाळासाहेब भवर, मेजर संपतराव सांगळे, भिमाशंकर नागरे, सोन्याबापू सांगळे, अशोक फड, निवृत्ती फड, दिलिप नागरे, कचरू आमले, सखुबाई सांगळे, हिराबाई नागरे, अनिल नागरे, गजानन आव्हाड, म्हाळू गायकवाड, रामदास दातीर, भाऊसाहेब नामदेव सांगळे, सुखदेव आंधळे, जगन्नाथ मुन्तोडे, शिवाजी मांढरे याच्यासह उमेदवार, सभासद व स्थानिक ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुलाबराव सांगळे पुढे म्हणाले की, संस्था बिनविरोध करण्यासाठी आम्ही पुढाकर घेतला होता. संस्थापकावरील सभासदाचा विश्वास उडाल्याचे त्याच्या लक्षात आम्ही आणून दिले. कुटुंबाव्यतिरिक्त दुसरे दोन उमेदवार द्या, त्याना बिनविरोध करु असे सांगितले होते. परंतु घरातीलचं व्यक्ती घ्या असा हट्ट संस्थापकाने लावून धरल्यामुळेचं आज निवडून होत आहे.
त्यानी पतसंस्थेच्या पैशाचा गैरवापर करत लोणीला शोरुम टाकत लकी ड्रॉ काढला. पण त्यातही आफरातफर केल्यामुळे तेथेही त्याना पळता भुई थोडी झाली. केवळ विश्वासामुळे २ कोटीच्या ठेवी आमच्या काळात १६ कोटीवर गेल्याचे सांगून भविष्यात त्या दुप्पट होणार असल्याचे म्हणाले. तर पुर्वी संस्थेच्या कार्यालयाऐवजी कर्जदाराला कर्जप्रकरण मजुंर करुन घेण्यासाठी संस्थापकाच्या घरी जावे लागत होते, असे सांगताना त्याच्यां काळातील कर्जप्रकरणे ही जर्दा पुडीच्या कागदावर लिहून मजूंर केली जात असल्याचा सनसनाटी आरोप गुलाबराव सांगळे यानी केला.
त्यावेळेस संस्थापक व इतरानी गैर मार्गाने संस्थेकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज भरण्यास ते असमर्थ ठरल्यामुळे त्यांनी डीडीआरकडून ४ लाख रुपये सुट मिळवली. त्यामुळे नियमानुसार ते संस्थेतुन बाहेर गेले. त्याचवेळी जर त्यानी त्याचा वारसदार नेमला असता तर संस्थेची सुत्रे इतराच्या हातात गेली नसती. तसेच त्यावेळी संस्थापकाचे हे नियमबाह्य कर्ज बुडवण्याचा हेतू असल्याचा खळबळजनक आरोप गुलाबराव सांगळे यानी केला. परंतू संस्थापकाच्या पाय उतारानतंर आलेल्या संचालक मंडळाने त्याच्यावर रितसर १०१ ची कारवाई करत पॉपर्टी लिलाव करुन कर्ज वसुल केले. त्यामुळे इतर कर्जदारानी आप-आपली कर्ज भरल्याने संस्था उर्जीत अवस्थेत आली. त्याचंमुळे आज संस्था प्रगतीपथावर आल्याचे गुलाबराव सांगळे यानी ठणकावून सांगितले.
तर संस्थेचे मागील व्यवस्थापक आव्हाड व जोधळे हे संस्थापकाच्या त्रासाला कटाळून निघुन गेल्याचे सांगताना आताचे व्यवस्थापक बाळासाहेब डहाळे हे नियमानुसार काम करत असल्यामुळेचं सुपारी देऊन आणलेले लोक त्याच्यावर टिका करत असल्याचे म्हणत विरोधकाचा समाचार घेतला.
आम्ही भविष्यात संस्थेच्या माध्यमातून कोअर बँकींग, क्युआरकोड, कृषी सीसी, होम लोन, दूध उत्पादकाना कर्ज वितरण करणार आहोत. सध्या कर्जवितरण १३ टक्के व्याजदरावर केले जात असून मागील चार वर्षापासून आम्ही सभासदाना १५ टक्के डिव्हिडंड वाटल्याचे सांगून जनसेवा विकास मंडळाच्या सर्व उमेदवाराना विजयी करण्याचे आवाहन गुलाबराव सांगळे यानी शेवटी केले.
याप्रसंगी जेष्ठ नेते भगवानराव इलग हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, सत्ताधारी मंडळीनी मागील दहा वर्षात केलेले काम व संस्थापकानी मागील पंचवीस वर्षात केलेले काम यातून स्वता:चे आत्मपरिक्षण करुन सत्ताधारी गटावर बेछूट आरोप करावेत. लायक कर्जदार मिळत नसल्यामुळे संस्थेकडे मोठ्या प्रमाणात ठेवी पडून आहेत.
संस्थेचे चेअरमन यानी संस्थेला रितसर तारण देऊन कर्ज घेतले आहे. परंतू विरोधक हे सभासदामध्ये गैरसमज पसरवत असले तरी, सुज्ञ सभासदाना सर्वकाही माहित असल्याने ते विरोधकाच्या भपंक प्रचाराला भुलणार नाहीत. तर गुलाबराव सांगळे यांच्या पँनलच्या पाठीशी उभे राहण्याचे आदेश ना. विखे पाटील यानी दिल्याचा गौप्यस्फोट भगवानराव इलग यानी यावेळी केला आहे.
दरम्यान याप्रसंगी जनसेवा विकास मंडळाचे उमेदवार विनित दिलीप गांधी, सखाहरी बाबुराव नागरे, तुळशीराम चांगदेव म्हस्के, भाऊसाहेब लक्ष्मण लावरे, वसंत धोडींबा वर्पे, संपत बाबुराव सांगळे, हरिभाऊ दत्तु ताजणे, भगवान गोधाजी खामकर, कल्पना गोवर्धन बोद्रें, पुष्पा बाळासाहेब भवर, राजेद्रं लहानु गिते यांच्यासह सभासद व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.