◻️ लोक जागे झाल्यामुळे इतर ठिकाणाहून चोरट्यानी काढला पळ
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथे बंद घराचे कुलूप तोडून सोन्या - चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला असून एक ठिकाणी शेजारील महिला जागी झाल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची माहिती परिसरात पसरल्याने एकचं खळबळ उडाली आहे.
विवेकानंद लोहाळे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारारीत म्हटले आहे की, मंगळवारी दुपारी पत्नी ही मुलीच्या बाळतंपणासाठी गेल्यामुळे मी मुलाला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून पुणे येथे गेलो होतो. तेथून बुधवारी दुपारी परत आलो असता अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोडा तोडून घरातील सामानाची उचकापाचक केल्याचे नजरेस पडल्यामुळे पुढे जाऊन पाहिले असता आतील कपाटातील एक तोळा वजनाचे गंठण, दोन तोळे वजनाचा सर, दिड तोळा वजनाची पोत, असे एकून साडेचार तोळे सोने व ७० हजार रुपये रोख रक्कम चोरी गेल्याचे माझ्या लक्षात आले.
त्यामुळे आश्वी पोलीस ठाणे येथे गुरंव नबंर ०२१६/२०२२ नुसार भादंवी कलम ४५४, ४५७ व ३८० प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
तसेच दुसऱ्या एका ठिकाणी अहमदनगर जिल्हा सहकार बॅके जवळील भर वस्तीत रात्री ३ वाजेच्या सुमारास ओंकारनाथ श्रीकिसन आसावा यांच्या बंद घराचे कुलूप तोडुन घरातील सामानाची चोरटे उचकापाचक करत होते. याचा आवाज आल्याने शेजारी राहत असलेल्या महिलेने बाहेर येण्यासाठी दार उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरुन त्याच्या घराला कडी लावलेली त्याच्यां लक्षात आले. त्यामुळे त्यांनी मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे आजुबाजुचे लोक जागे झाल्यामुळे चोरट्यांना याठिकाणाहून रिकाम्या हातानेच पळ काढावा लागला असून पाच ते सहा चोरटे असल्याचा अंदाज नागरीकानी व्यक्त केला आहे.
दरम्यान या चोरीच्या घटनामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस निरीक्षक सुभाष भोये, हवालदार विनोद गंभिरे आदिसह त्याच्या सहकार्यानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत बुधवारी रात्री उशीरा श्वान पथक चणेगाव मध्ये दाखल झाले होते अशी माहिती मिळाली आहे.