धक्कादायक.. बिबट्याने मध्यरात्री कोपीत झोपलेल्या चिमुकल्याला नेले ओढून

संगमनेर Live
0
◻️ आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा येथिल घटने परिसरात खळबळ

◻️ थरारक पाठलाग करत बिबट्याच्या जबड्यातून चिमुकल्याची सुटका

◻️ संगमनेर कारखाण्याच्या ऊस तोड मंजूराच्या आड्यावरील मध्यरात्रीची घटना

संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा परिसरात गुरुवारी मध्यरात्री आई वडीलासमवेत कोपीत झोपलेल्या चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला करत ओढून नेल्याची दुर्दैवी घटना घडली असून ऊस तोड मंजूर बिबट्यामागे पळाल्यामुळे या चिमुकल्याला बिबट्याच्या जबड्यातून सोडवण्यात यश आले असले तरी या चिमुकल्याची प्रकृती चितांजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साखर कारखाने सुरु झाल्यामुळे आश्वी खुर्द शिवारातील मोठेबाबा येथिल लक्ष्मीमाता मंदिराजवळ चाळीसगाव येथून आलेले संगमनेर साखर कारखान्याचे ऊस तोड मंजूराचे २० कुटुंब अड्डा करुन राहत आहेत. गुरुवारी हे ऊस तोड मंजूर आपल्या कोप्यामध्ये झोपलेले असताना मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास आधाराचा फायदा घेत बिबट्याने ऊस तोड मंजूराच्या कोपीत निर्धास्त झोपलेला चिमुकला विरु अजय पवार (वय - ३ वर्ष) याला जबड्यात घेऊन शंभर ते दिडशे फुटावर पलायन केले. 

त्यामुळे चिमुकला जोरात ओरडल्यामुळे आई वडीलासह शेजारील ऊस तोड मंजूरानी या बिबट्याचा थरारक पाठलाग करत त्याच्या जबड्यातून या चिमुकल्याची सुटका केली. या चिमुकल्याच्या मानेवर खोलवर जखमा झाल्यामुळे मोठा रक्तस्राव होत असल्याने त्याला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र चिमुकल्याची प्रकृत्ती खालवत असल्याने पहाटे ४ वा. त्याला नगर येथिल सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान मागील अनेक वर्षापासून प्रवरा नदी तिरावरील गावानमध्ये बिबट्याचा हैदोस सुरु असून शेतकऱ्याच्या पशुधनासह नागरीकावर प्राणघातक हल्ले होत आहेत. परंतू कोणत्याही उपाययोजना वनविभागाकडून केल्या जात नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. 

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची अहमदनगर जिल्ह्यातील पहिली घटना २० वर्षापूर्वी पिप्रीं लौकी आजमपूर या भागात घडली होती. परंतू २० वर्षानतंरही कोणतीही आश्वासक उपायोजना होत नसल्याने नागरीकानमध्ये संतापाची भावना आहे. यानिमित्ताने मानव - बिबट्ये संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आला असून दिवसेंदिवस वाढत असलेले बिबट्याचे हल्ले चितंणाचा विषय झाला आहे.

भरपाईत अडचणी.. उपाययोजनाही नाही..

आश्वी परिसरात बिबट्याने ठिकठिकाणी शेतकऱ्याच्या पशुधनासह नागरीकानवर हल्ले केल्यानंतरही कागद पत्राचे कागदी घोडे नाचवावे लागत असल्याने अनेक जण या भरपाई मागण्याच्या फदात पडत नाहीत. तर वन विभागाकडून कोणत्याही आश्वासक उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यामधून संताप व्यक्त होत आहे. बिबटे जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी यानिमित्ताने आश्वी सह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी केली आहे.

आश्वी परिसरात बिबट्याची प्रचंड दहशत आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी द्यावे लागते. एकीकडे पीक जगवण्याचे आव्हान तर दुसरीकडे बिबट्या हल्ला करेल की काय, याची भीती असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर घाबरले आहेत. त्यामुळे वन विभागाला आणखी किती बळी गेल्यानतंर जाग येणार आहे.? 

हरिभाऊ सोनवणे, मा. उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर


Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !