संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथिल तीन विद्यार्थ्याची वैद्यकीय क्षेत्रातील महत्वाच्या असणाऱ्या एमबीबीएस कोर्ससाठी निवड झाल्याबद्दल दाढ खुर्द ग्रामस्थांच्या वतीने संविधान दिनाचे औचीत्त्य साधून जाहीर संत्कार करण्यात आला.
यावेळी कु. सानिका शरद जोशी, चि. आदित्य दत्तात्रय जोरी व चि. अभिजित विठ्ठल साळवे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सानिका जोशी हिचे वडील शरद नानासाहेब जोशी हे गोखले ऐज्यूकेशन सोसायटी येथे कार्यरत आहेत. आदित्य जोरी याचे वडिल डॉ. दत्तात्रय विठोबा जोरी हे ग्रामीण रुग्णालय लोणी येथे वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत असून अभिजित साळवे याचे वडील विठ्ठल सीताराम साळवे हे शासकीय आयटीआय महाविद्यालयात संगमनेर येथे कार्यरत आहेत.
यावेळी आयोजित संत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी दाढ खुर्दचे सरपंच सतिश कुंडलिक जोशी होते. यावेळी पद्मश्री डॉ. वि. वि. पा. कारखान्याचे संचालक शांताराम महाराज जोरी, मा.पोलिस पाटील नारायणराव कहार, प्रवरा फळे भाजीपाला संस्थेचे संचालक आण्णासाहेब गेणुजी जोशी, अहिल्यादेवी पतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर वाडगे, त्र्यंबक जोरी, बाबासाहेब वाडगे, सीताराम साळवे, भिमराज बुधे, डॉ. साईनाथ जोशी, साहेबराव भांड, बाळासाहेब चा. जोरी, राजेंद्र धो. जोशी, भाऊसाहेब र. जोशी, निवृत्ती जोरी, अनिल पर्वत, संदिप नाईकवाडी, दत्तात्रय पर्वत, डॉ. साळवे, मुकुंद जोरी, बाबासाहेब जोशी, लोमेश्वर जोरी, अजय जोशी, अविनाश जोशी, शिक्षक ब्राम्हणे, कानडे, भांगरे, धराडे, डोखे, उर्मिला जोशी आदि उपस्थित होते.
या यशस्वी विद्यार्थ्यानी आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्वल करावे. व भविष्यात गावाची सेवा करावी. असे मत मान्यवरांनी मांडले. या गुणवंत विद्यार्थ्यानी आपल्या भावना यावेळी व्यक्त करताना गावाला आवश्यकता पडेल त्यावेळी गावाची सेवा करु, अशी ग्वाही दिली. तसेच पालकांच्या वतीने शरद नानासाहेब जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान याप्रसंगी जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्याना खाऊचे वाटप करण्यात आले असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक कानडे यांनी केले. तर मुकुंद जोरी यांनी आभार मानले आहेत.