◻️ ८६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल पोलीसाकडून हस्तगत
संगमनेर Live | जिल्हाचे नवीन पोलीस अधिक्षक राकेश ओला यानी जिल्ह्यात पाऊल ठेवताचं अवैंध धंदे बंद करण्याबरोबरचं गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली नेवासा येथे कारवाई करुन २२ वर्षीय तरुणाकडून २ गावठी कट्टे, एक सिगंल बोर रिव्हालवर व पाच जिवतं काडतूस हस्तगत करण्यात पोलीसाना यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना त्याना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एक इसम गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी शिंगवे तुकाई फाटा, नेवासा परिसरात येणार आहे. त्यामुळे पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोना शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व चापोना भरत बुधवंत यांच्या पथकाने शिंगवे तुकाई फाटा, ता. नेवासा येथे जावून सापळा लावला होता.
यावेळी एक संशयीत इसम हातामध्ये एक कापडी पिशवी घेवुन शिंगवे तुकाई फाट्याजवळील कमानी जवळ उभा राहुन आजुबाजूस संशसीत नजरेने पाहतांना दिसला. त्यामुळे पोलीस पथकाची खात्री झाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संशयीत इसमास ताब्यात घेवुन, त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव शुभम सुभाष सरोदे (वय २२, रा. गुंजाळ, ता. राहुरी) असे असल्याचे सांगीतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याचे हातातील पिशवीमध्ये दोन गावठी बनावटी कट्टे, एक सिंगल बोर गावठी रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतूसे असा एकूण ८६ हजार ५०० रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो पोलीसानी जप्त केला आहे.
पोना संदीप संजय दरंदले यांनी सोनई पोस्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कायदेशिर कार्यवाही सोनई पोस्टे करीत आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्या पथकाने केली आहे.