Big Beking.. आ. बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत

संगमनेर Live
0
◻️ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी मुंबईला जाणार

संगमनेर Live | मा. मंत्री आ. बाळासाहेब थोरात यानी ट्विट केल्यानतंर त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या खांद्याला दुखापत झाल्याची घटना आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे घडली आहे. आ. बाळासाहेब थोरात हे मॉर्निंग वॉक करत असतांना खोलगट भागात पाय गेल्याने ते पडले व डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणीसाठी मुंबई येथे जाणार असल्याची माहिती आ. थोरात यानी ट्विट करुन दिली असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे यामध्ये म्हटले आहे.

दरम्यान काळजीपोटी संगमनेर तालुक्यातून याबाबत चौकशीसाठी यशोधन कार्यालयाशी संपर्क साधला जात असल्याची माहिती मिळाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !