◻️ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत लोणी ला सुवर्ण पदक
संगमनेर Live (लोणी) | महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती, वजन उचलने, शरीरसौष्ठव स्पर्धेचे आजोजन दि. २३ व २४ डिसेंबर २०२२ रोजी सद्गुरू कृषी महाविद्यालय व जयशंकर कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय मिरजगाव येथे संपन्न झाल्या. यामध्ये म.फु.कृ.वि राहुरी अंतर्गत विविध संघांनी सहभागी होणार आहे.
या स्पर्धेत लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थी स्वप्नील कैलास सोनवणे याची शरीरसौष्ठव या स्पर्धेत ६० ते ६५ वजनी या गटात सुवर्ण पदक मिळवून महाविद्यालयाचे, संस्थेचे व आपल्या परिवाराचे नाव लौकिक केले. या स्पर्धेत ६० ते ६५ वजनी गटात १६ स्पर्धकांना सहभाग नोंदवला होता. याविद्यार्थ्याला महाविद्यालयाचे क्रिडा शिक्षक प्रा. सिताराम वरखड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
दरम्यान या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, म.फु.कृ. वि राहुरी चे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महाविरसिंघ चौहान, क्रिडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, संस्थेचे संचालक कैलास तांबे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. शुभांगी साळोखे, प्राचार्य विशाल केदारी यांनी अभिनंदन केले.