◻️ ३८ विद्यार्थी घेतायत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या कांगणवाडी येथील जिल्हापरिषद शाळेच्या विद्यार्थ्याना रोटरी क्लब ऑफ संगमनेर यांच्या प्रयत्नातून १६ टँबचे नुकतेचं वितरण करण्यात आल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी आता टँबच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे गारवताना दिसत आहेत.
रोटरी क्लब ऑफ संगमनेर यांच्या प्रयत्नातून रोटरी क्लब ऑफ नॉर्थ पुणे व रोटरी क्लब ऑफ तैवान तसेच ग्रामस्थाच्या सहकाऱ्यातून कांगणवाडी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेला १६ टँबचे नुकतेचं वितरण करण्यात आले. त्यामुळे शाळेतील ३८ विद्यार्थी हे खडूं आणि फळ्याबरोबरचं टँबच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण घेत असल्याने त्याच्या शिक्षकाच्या व ग्रामस्थाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचे समाधान पहावयास मिळत आहे. या टँबमध्ये अभ्यासाचे सॉफ्टवेअर असून सराव, खेळ, परीक्षा यासारख्या उपयुक्त शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने अभ्यासाचे धडे गिरवत आहेत.
त्यामुळे आधुनिक शिक्षण पध्दतीचा वापर सुरु झाल्याने कांगणवाडी गावचे रुपडे पालटायला सुरवात झाल्याची ही चाहूल म्हणावी लागेल. ग्रामस्थाच्या सहकाऱ्यामुळे शाळेला प्रोजेक्टर, ध्वनीक्षेपक, स्वच्छ शौचालय, आकर्षक रंगकाम केलेल्या शाळेच्या भितीं साकारण्यात आल्यामुळे विद्यार्थी मोठ्या उत्साही वातावरणात शिक्षणाचे धडे गिरवताना दिसत असून शाळेच्या शिक्षकाचे या सर्वामध्ये मोठे योगदान आहे.