◻️ शेडमध्ये ठेवलेल्या ३६ हजार रुपये किमंतीच्या ८ गोण्या केल्या होत्या लपांस
◻️ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आवळल्या चोराच्या मुसक्या ; मुद्देमाल केला हस्तगत
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारात ३६ हजार रुपये किमंतीचे सोयाबीन चोरीस गेल्यामुळे सिताराम बाळकृष्ण नागरे या शेतकऱ्यावर मोठे अर्थिक संकट कोसळले होते. त्यामुळे त्यानी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टंर नबंर २००/२०२२ नुसार भादंवी कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिबलापूर - पानोडी रस्त्यावर शेतकरी सीताराम नागरे यांची शेती व वस्ती असून त्यानी सोयाबीनची काढणी केल्यानतंर ८ गोण्यांमध्ये भरून वस्तीवरील शेडमध्ये ठेवली होती. मात्र, मध्यरात्री चोरट्याने ३६ हजार रुपये किमतीच्या ८ सोयाबीन गोण्या चोरुन नेल्या होत्या. त्यामुळे नागरे यानी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
यावेळी पोलीस निरीक्षक सुभाष भोये यानी तपासाची सुत्रे वेगाने फिरवत माहिती घेण्याचे काम सुरु केले असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचे धागेदोरे पोलीसाना मिळाले होते. आरोपी हा नियमित या परिसरात येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यामुळे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शिवाजी पवार, पोना शेख, विनोद गंभिरे, पोकॉ शिदें, चापोहे झोडंगे यांच्या पथकाने आरोपी सुखदेव किसन पारधी (वय - ४५, रा. कळस, ता. अकोले) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेत त्याच्याकडून मुद्देमाल ही हस्तगत केला आहे.