◻️ उंबरी बाळापूर सह पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल संकल्प पोल्ट्री फार्मचे सर्वेसर्वा तसेच आपल्या हसतमुख स्वभावाने आश्वी पंचक्रोशीत मोठा मित्रपरिवार निर्माण करणारे सचिन वसंत सारबंदे (वय - ४१) याचे ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने गुरुवारी पहाटे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
सचिन सारबंदे हे रंजन दूध डेअरी साठी डिग्रंस व मालुंजे परिसरात दूध संकलन करत होते. त्यामुळे दूध उत्पादक, शेतकरी यासह आश्वी पंचक्रोशीत मोठा मित्र परिवार जोडला होता. गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे आपल्या पोल्ट्री फार्म मध्ये गेले असता त्याना ह्रदयविकाराचा झटाका आला. त्यामुळे त्यांना लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचे यादरम्यान निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
दिवगंत सचिन सारबंदे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ व चुलते असा मोठा परिवार आहे. रोज भेटनारा सचिन आता आम्हाला आता भेटणार नाही, या कल्पनेने अनेकाना अश्रु अनावर झाले असून त्याच्या दुर्दैवी व अकस्मित निधनामुळे पंचक्रोशीत सर्वत्र शोककळा पसरल्याचे चित्र आहे. पशुवैद्यकीय डॉ. अनिल सारबंदे यांचे ते बंधू होते.