संगमनेर Live | तालुक्यातील अग्रगण्य व आश्वी सह पंचक्रोशीतील व्यापार, उद्योग व शेतकऱ्याची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी सह. पंतसंस्थेची नुकतीचं निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली होती. या निवडणूकीमध्ये जनसेवा विकास मंडळाने दणदणीत विजय मिळवून ११ च्या ११ जागावर मोठ्या फरकाने विजय संपादित केला होता.
यामुळे बुधवारी सकाळी संस्थेच्या मुख्य कार्यलयात नवनिर्वाचित संचालकाची बैठक संपन्न झाली. यामध्ये सर्वानुमते चेअरमनपदी मेजर संपतराव सांगळे तर व्हा. चेअरमनपदी विनित उर्फ गुड्ड गांधी यांची निवड करण्यात आली.
बुधवारी सकाळी आश्वी बुद्रुक येथिल संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी योगेश कापसे यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी चेअरमन पदासाठी मेजर संपतराव सांगळे यांच्या नावाची सूचना संचालक वसंत वर्पे यानी माडली व तिला अनुमोदन संचालक सखाहरी नागरे यानी दिले. तर व्हा. चेअरमन पदासाठी विनित उर्फ गुड्ड गांधी यांच्या नावाची सुचना संचालक भाऊसाहेब लावरे यानी मांडली व तिला अनुमोदन संचालक हरिभाऊ ताजणे यानी दिले. यावेळी तुळशीराम म्हस्के, भगवान खामकर, कल्पना बोद्रें, पुष्पा भवर, राजेद्रं गिते या संचालकानी सर्वानुमते या दोन्ही नावावर शिकामोर्तब केले आहे.
यानतंर नुतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा मोठ्या उत्साही वातावरणात संत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते अँड. शाळीग्राम होडगर, प्रवरा बँकेचे चेअरमन अशोकराव म्हसे, विनायकराव बालोटे, माधवराव गायकवाड, गुलाबराव सांगळे, भगवानराव इलग, रामभाऊ भुसाळ, भाऊसाहेब जऱ्हाड, अँड. रोहीनीताई किशोर निघुते, बाळासाहेब भवर, जेऊरभाई शेख, सुमतीलाल गांधी, संजय गांधी, मिलिंद बोरा, सुशिल भंडारी, प्रितंम गांधी,
सोन्याबापू सांगळे, बाळासाहेब सांगळे, भारतराव गिते, एकनाथराव नागरे, दिनकर आंधळे, संजय गांधी, शिवाजीराव इलग, दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी, सुखदेव आंधळे, गजानन आव्हाड, रामदास दातीर, सीताराम गिते, बाळासाहेब भोसले, प्रदीप वाल्हेकर, लिलाबाई कदम, सुशिला सांगळे यांच्यासह नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब डहाळे सह परिसरातून आलेले जेष्ठ कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त डॉ. राजेद्रं विखे पाटील यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी यानीही नुतन चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुंभेच्छां दिल्या आहेत.