◻️ हभंप दत्तगिरी महाराज व जयश्रीताई थोरात यांची सोहळ्याला हजेरी
◻️ महंत आदिनाथ महाराजाच्या सुश्राव्य किर्तणाने भक्तीची उधळण
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल आदर्शमाता सरुबाई रामभाऊ सांगळे यांचा ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्याचे सुपुत्र व उद्योजक बापूसाहेब सांगळे यानी विविध सामाजिक उपक्रम राबून अभिष्टचितंन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला आहे. यावेळी हभंप दत्तगिरी महाराज व जयश्रीताई थोरात यांनी या सोहळ्याला हजेरी लावत आईचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल बापूसाहेब सांगळे यांचे अभिनंदन केले.
यावेळी सकाळी आदर्शमाता सरुबाई रामभाऊ सांगळे यांची सकाळी सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. यानंतर लक्ष्मीमाता मंदिर प्रागंणात तारकेश्वर गडाचे (जि. बीड) महंत आदिनाथ महाराज शास्री यांचे आईवर आध्यात्मात सागिलेले वर्णन व दाखले देऊन केलेले अमृतूल्य किर्तणामुळे परिसरात भक्तीचा सुगंध दरवळला.
यावेळी दत्तगिरी महाराज यानी आदर्शमाता सरुबाई सांगळे याना आशिर्वाद दिले. तसेच कँसरतज्ञं जयश्रीताई थोरात यानी ही या सोहळ्याला हजेरी लावत आईचा वाढदिवस सोहळा साजरा केल्याबद्दल उद्योजक बापूसाहेब सांगळे यांचे कौतुक केले. तर गणपतराव सांगळे यानी अशाचं प्रकारे प्रत्येकाने आई - वडीलाचे वाढदिवस साजरे करण्याचे आवाहन केले आहे. याप्रसंगी उपस्थित मान्यवंराच्या हस्तें ऊसतोड मजुंर व महिलाना उबदार कपड्याचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान या अभिष्टचितंन सोहळ्यासाठी मोहटा देवी ट्रस्टचे विश्वस्त पालवे, यमनाजी आघाव, विक्रम थोरात, बळवंतराव थोरात, ऊमाजी पुणेकर, दिनकर आंधळे, राजु चकोर, रंगनाथ फड, रंगनाथ हरिभाऊ फड, राजेंद्र हरिभाऊ सांगळे, शांताराम बाबुराव फड, दिलीप भास्कर सांगळे, दत्तात्रय शांताराम नागरे, राजेंद्र बर्डे, अनिल माधव फड, सुनिल गंगाधर नागरे,
सकाहारी हौशिराम आमले, राजु आंधळे, महेश आमले, साहेबराव सोनवणे, भाऊसाहेब धोंडीबा फड, बाळासाहेब सानप, जगन्नाथ घुगे, शामराव गायकवाड, प्रदिप पावडे, नंदु नागरे, शितलताई उगलमुगले, जगजीवन उगलमुगले, सौ. रेखा सांगळे, सुरेश फड, अशोक फड, उद्योजक बापूसाहेब सांगळे, सौ. लिलाबाई सानप, सुनिता सांगळे, जान्हवी सांगळे, तुषार सांगळे, रुत्व सांगळे आदिश्री सांगळे यांच्यासह शेडगाव पंचक्रोशीतून आलेले नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थं मोठ्या संख्येने उपस्थित होते.