◻️ पद्मभुषन मा. खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती पित्यर्थ मोरया क्रिकेट क्लबचा उपक्रम
संगमनेर Live | पद्मभुषन मा. खा. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती पित्यर्थ संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक याठिकानी मोरया क्रिकेट क्लबकडून शुक्रवार दि. २३ डिसेंबर ते शनिवार दि. ३१ डिसेंबर दरम्यान भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे स्पर्धेचे सलग तिसरे वर्ष आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजयी संघाना प्रथम पारितोषिक म्हणून २१ हजार १२१ रुपये, द्वितीय पारितोषिक १५ हजार ११५ रुपये, तृतीय पारितोषिक म्हणून ७ हजार ७७७ रुपये तसेच चतुर्थ परितोषिक म्हणून ५ हजार १११ रुपये बक्षिस स्वरुपात मान्यंवराच्या हस्तें प्रदान केले जाणार आहे. यावेळी प्रत्येक सामानावीर खेळाडूला टि शर्ट देणार असल्याची माहिती आयोजकानी दिली आहे.
दरम्यान या भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेत आश्वीसह तालुक्यातील क्रिकेट संघानी सहभागी व्हावे असे आवाहन सार्थक ब्राम्हणे, कुणाल ब्राम्हणे, कार्तिक गायकवाड व मोरया क्रिकेट क्लबच्या सर्व सदंस्य तसेचं सहकाऱ्यानी केले असून या स्पर्धा आश्वी बुद्रुक येथिल श्रमिक कृषी सेवा केंद्रामागे खेळवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकानी दिली आहे.