◻️ जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्याना केले शालेय साहित्याचे वाटप
संगमनेर Live | महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना महापरिनिर्वाण दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अभिवादन करण्यात आले असून यावेळी जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करुन महामानवाच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
यावेळी प्रथम आश्वी बुद्रुक येथिल नव्याने आकारास येत असलेल्या शोर्यस्तभ येथे डॉ. आंबेडकर याच्यां तैलचित्रलाला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुभाष भोये, सरपंच महेश गायकवाड, ग्रामपंचायत सदंस्य प्रवीण गायकवाड, अस्लम शेख, पोलीस नाईक शांताराम झोडंगे, रामदास गायकवाड, विलास गायकवाड, राजू गायकवाड, मच्छिद्रं गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, योगेश पिलगर, रावसाहेब पंडीत, अमोल जऱ्हाड, सुनील गायकवाड, सोमेश गायकवाड, नामदेव शिदें, विजय आवरे याच्यांसह भीम गर्जना युवा प्रतिष्ठानचे सर्व सदंस्य उपस्थित होते.
दरम्यान यावेळी जिल्हापरिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.