◻️ चौधरवाडी येथे सुरू असलेल्या माणिकगिरी व बिरोबा महाराज फिरत्या सप्ताहाला डॉ. जयश्री थोरात यांची भेट
◻️ सप्ताहाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल केले कौतुक
संगमनेर Live | चौधरवाडी हे ४० उंबरे असलेले छोटस गाव असल्याची माहिती मला मिळाली होती. परंतू येथे आल्यानतंर पुढे बसलेला जनसमुदाय पाहिल्यानतंर गाव लहान असल तरी मनाने फार मोठे आहे, यांची प्रचिती आली. छोट्याशा गावाने पंचक्रोशीतील भाविक व नागरीकाच्या सहकार्याने अखंंड हरिनाम सप्ताहाचे केलेले नियोजन हे वाखाणण्याजोगे असल्याच्या भावना कँन्सर तज्ञं डॉ. जयश्री थोरात यानी व्यक्तं केल्या.
संगमनेर तालुक्यातील चौधरवाडी येथे सुरु असलेल्या माणिकगिरी व बिरोबा महाराज फिरत्या सप्ताहाला डॉ. जयश्री थोरात यांनी भेट दिली. त्याप्रसंगी भाविकाशी संवाद साधताना डॉ. जयश्री थोरात बोलत होत्या. यावेळी हभंप दत्तगिरी महाराज यांच्यासह पंचक्रोशीतील गावातून आलेले भाविक उपस्थित होते. यावेळी त्यांनी दत्तगिरी महाराचे आशिर्वाद घेतले आहेत.
यावेळी जयश्री थोरात यानी प्रथम भाविकाना आपली ओळख करुन देताना उपस्थित भाविक महिलाना उद्देशून म्हणाल्या की, महिला या दिवसरात्र कुटुंबासाठी कष्ट घेत असतात. त्यामुळे स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास त्याना वेळ नसतो. त्यामुळे महिलानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असून शरिरावर कोठेही गाठ आसल्यास दुर्लक्ष न करता ती डॉक्टराना दाखवा व त्यावर उपचार करुण घ्या असे आवाहन केले.
तर आजोबा, वडीलाकडुन समाजसेवेचा वारसा मिळाल्यामुळे तसेच समाजकार्याची आवड असल्याने मी समाजसेवा करत आहे. चौधरवाडी सह पंचक्रोशीतील ग्रामस्थानी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला आल्यानतंर येथिल भक्तीमय वातावरण व उत्कृष्ट नियोजनामळे दिवसेंदिवस गर्दी वाढत असल्याचे गौरोउद्गार त्यानी काढले आहे. यावेळी पंचक्रोशीतून आलेला भाविकाचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.