◻️ खासदार संजय राऊत शिर्डीत ; श्री साईबाबां समाधीचे घेतले दर्शन
◻️ छत्रपती उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राच्या भावना व्यक्त करतायत
संगमनेर Live (शिर्डी) | छत्रपती शिवाजी महाशिवसेना ही शेरों की पार्टी आहे त्यामुळे आम्ही जेल असो की बंदुकीची गोळी असो कशालाही घाबरत नाहीराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालां विरोधात मंत्रिमंडळ बैठकीत निंदा प्रस्ताव यायला पाहिजे होता. मात्र तसे घडले नाही. सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांचा निषेधही केला गेला नाही. त्यामुळे एक मूक समर्थनच राज्यपालांना सत्ताधारी देत आहेत. शिवसेना ही शेरों की पार्टी आहे. त्यामुळे आम्ही जेल असो की बंदुकीची गोळी असो कशालाही घाबरत नाही. असे परखड मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
खासदार संजय राऊत यांनी आज शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबां समाधीचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर त्यांचा साईसंस्थानचे उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सत्कार केला. शिर्डीतील शासकीय व्हीआयपी विश्रामगृहावर त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेऊन चर्चाही केली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान राज्यपालांनी केला. मात्र सत्ताधारी यांनी साधा निषेधही केला नाही. छत्रपती उदयनराजे भोसले हे जे बोलतात ते महाराष्ट्राच्या भावना व्यक्त करतात. मराठी माणसाची खदखद ते व्यक्त करत आहेत. टकमक टोकाचा वापर साडेतीनशे वर्षांनी का होईना व्हायला हवा असेही उपरोधात्मक ते यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हणाले.
मला शंभर दिवस तुरुंगात पाठवणाऱ्यांचे मी आभारी आहे कारण त्यामुळे पक्ष आणखी मजबूत झाला आहे. कार्यकर्त्यांना लढायला आणखी बळ मिळाले आहे. शिवसेना ही शेरों की पार्टी आहे. त्यामुळे तुरुंग असो की बंदुकीची गोळी असो आम्ही कशालाही घाबरत नाही. असे सांगितले. आमदार संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केले त्याबद्दल विचारताच ते वेडे झाले आहेत वेड्यांच्या काय नादी लागायचे असे उपरोधक टोमणाही राऊत गायकवाड यांना मारला.
यावेळी राहता तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे राहता तालुका अध्यक्ष सचिन कोते, शिर्डी शहराध्यक्ष संजय आप्पा शिंदे, युवा सेना तालुका अध्यक्ष संदीप विघे, तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. खासदार संजय राऊत यांचे शिर्डीत विश्रामगृहावर आगमन होताच ‘जय भवानी’ ‘जय शिवाजी’च्या घोषणाही शिवसैनिकांनी यावेळी दिल्या.