◻️ तालुका वैद्यकीय अधिकारी यानी आदेश दिल्यानतंर डॉ. कोडांजी मदने यानी दाखल केली होती तक्रांर
◻️ पोलीसासह आरोग्य विभागाला मागील ९ महिन्यापासून आरोपी देत होता गुंगारा
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे बोगस डॉ. असिम दास हा मंजुमाता दवाखाना चालवत असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी यानी ७ मार्च २०२२ रोजी आश्वी खुर्द येथिल प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी कोडांजी मदने याना दिले होते. त्यामुळे कारवाईच्या भितीने पळून गेलेल्या बोगस डॉ. असिम दास यांच्यावर आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानतंर पोलीसासह आरोग्य विभागाला गुंगारा देण्याऱ्या बोगस डॉक्टरच्या ९ महिन्यानतंर मुसक्या आवळण्यात आश्वी पोलीसाना यश आले आहे.
याबाबत पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पानोडी येथे बोगस डॉ. असिम दास हा मजुंमाता नावाने मागील अनेक दिवसापासून दवाखाना चालवत होता. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप याना मिळाल्यानतंर त्यांनी आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने याना याबाबत कारवाई करुन आवाहल सादर करण्याचे आदेश ७ मार्च २०२२ रोजी दिले होते.
त्यामुळे डॉ. कोडांजी मदने हे पानोडी उपकेद्रांचे समुदाय आरोग्य अधिकारी अमोल उगलमुगले यांच्या समवेत पानोडी येथे दवाखाना असलेल्या ठिकाणी गेले होते. परंतू कारवाई होण्याच्या भितीने आधिचं बोगस डॉ. असिम दास याने घटनास्थळाहून पलायन केले होते. यावेळी डॉ. मदने याना हा दवाखाना एका खाजगी घरात असून त्यावर एक फलक लावलेला दिसला. त्या फलकावर मंजुमाता दवाखाना डॉ. असिम दास (निसर्गोपचार) तसेच विविध आजारी नावे लिहिलेली होती.
याबाबत डॉ. मदने यानी मेडिकल कौसिल कडे याबाबत चौकशी केली असता या व्यक्तीच्या नावे रजिस्ट्रेशन अथवा पदवी आढळून आली नाही. त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्यात या बोगस डॉक्टर विरुद्ध गुन्हा रजिस्टर नबर ३५/२०२२ नुसार महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान मागील ९ महिन्यापासून या बोगस डॉक्टरचा आश्वी पोलीस कसून शोध घेत होते. परंतू त्याचा काहीही थांगपत्ता पोलीसाना आढळून येत नव्हता. नुकतीचं पोलीस निरीक्षक सुभाष भोये याना आरोपी असिम दास हा नगर येथील पारेगाव येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यामुळे पोलीस उप निरीक्षक शिवाजी पवार याना याबाबत कारवाईच्या सुचना देण्यात आल्या होत्या. सुचना मिळताचं पोलीस उप निरीक्षक शिवाजी पवार व पोलीस नाईक हुसेन शेख यानी पारेगाव येथे जाऊन आरोपी असिम चित्ररंजन दास याच्यां मुसक्या अवळत आश्वी पोलीस ठाण्यात हजर केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.