◻️ जोर्वेत ना. विखे पाटील यांचा सरपंच, बहुमत मात्र आ. थोरात गटाला
◻️ निमगावजाळीत सरपंच आ. थोरात गटाचा, बहुमत मात्र ना. विखे पाटील गटाला
◻️ तळेगाव दिघे, निमोण, जोर्वे व कोल्हेवाडी येथे ना. विखे पाटील यांचे सरपंच आले निवडून
संगमनेर Live | मंगळवारी झालेल्या मतमोजणीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा विकास मंडळाने संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी व जोर्वे गटातील १० ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा फडकवला असून ४ ग्रामपंचायतीवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाने विजय मिळवला आहे. तर जोर्वे ग्रामपंचायतीत थोरात गटाला धक्का देत ना. विखे पाटील गटाच्या प्रिती गोकूळ दिघे या निवडूण आल्यामुळे दिवसभर जिल्ह्यात याच ग्रामपंचायतीची चर्चा सुरु होती.
संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधासभा मतदार संघातील १० ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीचं पार पडली होती. यामध्ये ना. विखे पाटील व आ. बाळासाहेब थोरात यांच्या समर्थक कार्यकर्त्यानी आरोप - प्रत्याआरोपाच्या फैरी झाडत ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निकालाकडे पुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. ना. विखे पाटील यानी आश्वी व जोर्वे या दोन्ही गटात प्राबल्य राखले असले तरी चार ग्रामपंचायती गमावल्याचे शल्य कार्यकर्ते लपवू शकलेले नाही.
यामध्ये प्रामुख्याने ना. विखे पाटील याच्या जनसेवा मंडळाकडून जोर्वे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदी प्रिती गोकूळ दिघे (१,८६० मते) यानी विजय मिळवला असून एकून १३ सदस्य पदाच्या जागापैकी ४ जागी जनसेवा मंडळाने विजय मिळवला आहे. तर स्पष्ट बहुमत राखण्यात आ. थोरात गटाला यश आले आहे.
रहिमपूर ग्रामपंचायतीत जनसेवा मंडळाच्या सविता लक्ष्मण शिदें (१,००५ मते) या लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाल्या असून एकून सदंस्य पदासाठी असलेल्या ९ जागापैकी ५ ठिकाणी जनसेवा मंडळाने विजय मिळवला आहे.
कोल्हेवाडी ग्रामपंचायतीत जनसेवा मंडळाच्या सुवर्णा राहुल दिघे (२,०३५ मते) या लोकनियुक्त सरपंच पदी निवडून आल्या असून एकून ११ सदंस्य पदासाठी असलेल्या १० जागेवर जनसेवा मंडळाने विजय मिळवला आहे.
निबांळे ग्रामपंचायतीत जनसेवा मंडळाच्या भगीरथी महादेव काठे (५४३ मते) या लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाल्या असून ७ जागावर विखे पाटील गटाचे सदंस्य पदाचे उमेदवार बिनविरोध निवडूण आले आहेत.
कणकापूर ग्रामपंचायतीत जनसेवा मंडळाच्या ज्योती अंकुश पंचपिड (३०७ मते) या लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाल्या असून एकून सदंस्य पदाच्या ७ जागापैकी ४ जागेवर विजय मिळवला आहे.
सादतपूर ग्रामपंचायतीत नारायण निवृत्ती गुंजाळ (५३२ मते) हे लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाले असून याठिकाणी विखे गटातचं लढत झाली होती. या ग्रामपंचायतीत ६ जागासाठी निवडणूक पार पडली असून एक जागा बिनविरोध निवडूण आली आहे. त्यामुळे या सहा ग्रामपंचायतीवर ना. विखे पाटील गटाने झेंडा फडकवला आहे.
निमगावजाळी ग्रामपंचायतीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रतिभा सोमनाथ जोधंळे (१,२९४ मते) या लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाल्या असून सदंस्य पदासाठी असलेल्या १३ जागापैकी १० जागावर विजय मिळवला आहे.
ओझर खुर्द ग्रामपंचायतीत गिरीजा अण्णासाहेब साबळे (७११ मते) या लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाल्या असून सदंस्य पदाच्या ९ जागापैकी ५ जागेवर शेतकरी मंडळाऐ विजय मिळवला आहे.
उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीत अर्चना सुभाष भुसाळ (१.२७५ मते) या लोकनियुक्त सरपंच पदी विजयी झाल्या असून एकून सदंस्य पदाच्या ११ जागापैकी ८ जागेवर शेतकरी मंडळाने विजय मिळवला आहे.
हंगेवाडी ग्रामपंचायतीत कमल राजेद्रं कांगणे (५३७ मते) यानी लोकनियुक्त सरपंच पदी विजय मिळवला असून सदंस्य पदाच्या ७ जागापैकी ५ जागेवर शेतकरी मंडळाने विजय मिळवला आहे. यामध्ये दोन उमेदवाराना समसमान मते पडल्यामुळे देवचिठ्ठी काढून शेतकरी मंडळाचा उमेदवार विजयी झाल्या आहेत.
दरम्यान संगमनेर तालुक्यातील मालुंजे ग्रामपंचायतीत सुवर्णा संदीप घुगे (१,०२७ मते), निमोण ग्रामपंचायतीत संदीप भास्कंर देशमुख (२,१८९ मते) व तळेगाव दिघे ग्रामपंचायतीत उषा रमेश दिघे (२,६६७ मते) हे नामदार विखे पाटील गटाचे उमेदवार लोकनियुक्त सरपंच पदी विराजमान झाल्यामुळे संगमनेर तालुक्यात ना. विखे पाटील यांची ताकद वाढल्याचे चित्र आहे.
१० ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणूक आकडेवारी..
जोर्वे :- बादशाह रामकृष्ण बोरकर (४८४), संदीप नारायण काकड (५३४), सुनिता बाळासाहेब दिघे (५२८), दिगंबर नामदेव इंगळे (३२४), पुनम किरण बर्डे (३९०), संगीता राजेद्रं थोरात (३३६), किसन हिरामण खैरे (३४५), मंगल विलास काकड (३४१), हौशीराम लहानु दिघे (३५३), लक्ष्मी संपत राक्षे (३५९), रविद्रं बबन वाकचौरे (४४७), सुवर्णा योगेश जोर्वेकर (२९८) व मिराबाई नानासाहेब थोरात (२७६)
निमगावजाळी :- भास्कर योहान खरात (४८०), वैभव भाऊसाहेब वदक (५३४), पुष्पा तान्हाजी डेगंळे (५१६), ज्ञानेश्वर बाळासाहेब डेगंळे (३४८), कमल बाबासाहेब थेटे (४०५), संगिता मधुकर तळोले (३९३), सुरेश दगडू डेगंळे (२८१), मंदा राजेद्रं आरगडे (२६४), दिलिप शिवाजी डेगंळे (५१२), उषा भिमा पवार (५५६), बाबासाहेब ज्ञानदेव डेगंळे (४६१), साक्षी अमोल जोधंळे (४४९) व सीमा बाबासाहेब तळोले (३७८)
उंबरी बाळापूर :- किसन सखाराम खेमनर (३०१), नानासाहेब सुखदेव उंबरकर (२३३), निर्मला हिरामण बर्डे (२२८), अश्विनी भगिरथी भुसाळ (३८३), मनिषा स्वप्निल उंबरकर (३८२), अनिल वसंत सारबंदे (३८८), सुभाष सोपान उंबरकर (३०९), मारथाबाई तेजानंद शेळके (३०८), मच्छिद्रं गोपीनाथ भुसाळ (२६९), पुजा योगेश डोखे (३२०), राणी विजय शेळके (२९८)
रहिमपूर :- संजय केशव खुळे (४७४), गजानन लहानू शिदें (४५०), पुष्पा संभाजी गुळवे (बिनविरोध), सुभाष रंगनाथ वाळूज (३४६), योगिता गणेश गुळवे (३४५), सविता संदीप शिदें (३५९), राहुल अशोक गुळवे (३१९), लहानबाई शिवाजी मोरे (बिनविरोध), मीनाक्षी शरद शिदें (३१३)
सादतपूर :- सरिता रावसाहेब मगर (१७१), लताबाई सुभाष मगर (१५७), सागर बाळासाहेब कडलग (२१२), कल्याणी प्रविण कडलग (बिनविरोध), शुभम नवनाथ काळे (२५९), दिलीप संपत मगर (२३७), जया शामराव मगर (२२१)
निबांळे :- खतिब बाबु शेख, कमल लहानु गायकवाड, शाहजान वसीम शेख, ईषा सर्जेराव पर्बत, सचिन दगडू पर्बत, संपत मधुकर पर्बत व संगिता दत्तात्रय पर्बत हे सर्व बिनविरोध निवडून आले आहेत.
कोल्हेवाडी :- इंद्रभान चांगदेव दिघे (४८१), काशिनाथ मुरलीधर वामन (४७६), सुनिता बाळासाहेब दिघे (५५२), मोहन कोडांजी वामन (३३४), शांताबाई काळू खैरे (३५७), मंगल भानुदास कोल्हे (३८४), काशिनाथ आबु अरगडे (३२२), भारती दत्तात्रय कोल्हे (३१७), जालिंदर बाळकृष्ण दिघे (४५९), सविता भाऊसाहेब बलसाने (४३४), धनंजय शांताराम खुळे (४१५), परिगाबाई बाबासाहेब खुळे (५०९) व मनिषा मधुकर खुळे (३५८)
कणकापूर :- लहानु कारभारी शिदें (१२५), मंगल बन्सी मोरे (१३३), आशा बाबुराव शिदें (१३५), बडुं साहेबराव मोरे (१०४), अस्मिता जगदीश शिदें (१०१), राधाकिसन जिजाबापू चौधरी (७९) व संगिता सुखदेव पंचपिड (८२)
हंगेवाडी :- नितिन सोमनाथ सांगळे (२४४), इंदुबाई इंद्रभान केकाण (२५९), योगिता योगेश कांगणे (२५४), संतोष लहानु कांगणे (१९६), कलाबाई विश्वनाथ पवार (१८६), नंदू सुखदेव घुगे (१६५) व मिराबाई गहिनीनाथ सांगळे (१६८)
ओझर खुर्द :- सुदंरनाथ चंद्रभान शेजुळ (२०७), दगडू काशिनाथ शेपाळ (२०३), शुभांगी अरुण कदम (२०३), बकुनाथ दत्तु साबळे (३१८), चांदणी दिलिप कदम (३३५), कविता शिवाजी शिदें (२९४), गंगाधर खंडू थोरात (२२२), विजया अशोक गायकवाड (२५६) व कल्पना बाळासाहेब वर्पे (२५४)