◻️ तिर्थ क्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येणार, जैन समाजाच्या वतीने बंदची हाक
संगमनेर Live | जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या झारखंड राज्यातील श्री सम्मेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील आश्वी येथिल सकल जैन समाजाच्या वतीने आज बुधवारी (दि. २१) बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारणी सदंस्य व जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यानी दिली आहे.
श्री सम्मेद शिखरजी हे झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील जैन धर्मियांचे पवित्र तिर्थक्षेत्र असून राज्यातील सर्वात उच पर्वत पारसनाथ टेकडीवर आहे. येथे २४ जैन तिर्थकरापैकी २० तिर्थकरानी तपश्चर्या करत मोक्षप्राप्ति केली असे मानले जाते. त्यामुळे या क्षेत्राला ‘सिध्दक्षेत्र’ म्हणूनही जगभरात ओळखले जाते. जैन धर्मात या क्षेत्राला तिर्थराज अर्थात तिर्थाचा राजा मानले जाते.
येथे २३ वे तिर्थकर भगवान पार्श्वनाथ यांनीही निर्वान प्राप्त केले होते. त्यामुळे श्री सम्मेद शिखरजी हे जैन धर्मियाचे जगप्रसिद्ध व अतिशय महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्याने लाखो अहिंसा व शांतताप्रिय भाविक याठिकाणी येत असतात. श्री सम्मेद शिखरजी हे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केल्यास या पवित्र स्थळाचे व जैन धर्मियाचे पावित्र्य नष्ट होणार असल्याने या निर्णयाचा विरोध होत असून या निर्णयाच्या निषेधार्थ बुधवारी आश्वी येथिल सर्व जैन बांधव आपली दुकाने बंद ठेवत सकाळी मोर्चा काढून शांततेच्या मार्गाने निषेध नोदंवणार आहेत.
दरम्यान या बंदमध्ये सर्व समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन अश्विनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विनीत गांधी, योगेश रातडीया, अनिकेत पटवा, संजय गांधी, प्रशांत गांधी, सुशिल भंडारी, श्रेयंस बोरा, अभीजीत गांधी, रोहीत भंडारी, निलेश चोपडा, अमित भंडारी, प्रितम गांधी, किरण गांधी, वैभव भंडारी, अश्विन मुथ्था, नितीन गांधी, अभिजीत बिहाणी, पप्पलेश लाहोटी, समीर गांधी, निलेश रातडीया, योगेश लुंकड, सागर रातडीया, जयंत्तीलाल भंडारी, गौतम रातडीया, अविनाश गांधी, संदिप बोरा, भगवान बोरा, विशाल गांधी, मनोज पटवा, किशोर पटवा आदिसह जैन बांधवानी केले आहे.