◻️ हिवाळी अधिवेशनात नागपूर विधानभवनावर पोलीस पाटील यांचा मोर्चा धडकणार
संगमनेर Live | गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसाना सहकार्य करण्यात महत्वाची भुमिक बजावणार्या पोलिस पाटील यानी माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात याची भेट घेत विविध मागण्याचे निवेदन देत लक्ष वेधले आहे.
शासन आणि स्थानिक पातळीवरील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. गेल्या दहा वर्षापासूनसू पोलीस पाटील किमान पंचवीस हजार रुपयांचे मानधन मिळावे. पोलीस पाटलांच्या पाच वर्षांचे नूतनीकरण पद्धत कायमस्वरूपी बंद करावी, पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकी असलेल्या गावांमध्ये पोलीस पाटील पद कायम ठेवावे, त्यांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे पर्यंत करावे, कर्तव्यावर मृत्यू पावलेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना अनुकंपा धर्तीवर पोलीस पाटील पदी नियुक्त करावे.
कोरोना काळात दगावलेल्या पोलीस पाटलांच्या वारसांना ५० लाखांची मदत द्यावी, किमान वेतन कायदा लागू करावा, पोलीस पाटलांच्या मुलांना पोलीस भरतीत प्राधान्य द्यावे, सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन किंवा १० लाख रुपये एक रकमी देण्यात यावे, तसेच वाळू संदर्भात लावलेल्या ड्युटया कायमस्वरूपी बंद करण्यात याव्यात आदी विविध मागण्यां या निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आल्या आहेत.
एकीकडे पोलिस पाटलांचा गावात रुबाब वाढवत असला तरी त्या प्रमाणात त्यांची आर्थीक परीस्थीतीही असली पाहीजे. अशी त्यांंची अपेक्षा आहे. कारण सध्या पोलीस पाटलांना साडे सहा हजार रुपये एवढे तुटपुंंजे मानधन मिळत आहे. महागाईच्या काळात दोनशे रुपये रोजात गाडा चालवीणे अवघड होते. म्हणुनच किमान १८ हजार रुपये तरी मानधन करा. ही त्यांची मागणी आहे. त्यासाठी ते २२ डिसेंबरला नागुपर विधानसभवेर धडकणार आहेत.
संगमनेर तालुक्यातील पोलिस पाटीलही यात मोठ्या संंख्येने सहभागी होणार असून पोलिस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोकराव थेटे, राजेद्रं कानवडे, रमेश वर्पे, आंधळे, मथाजी पावसे, ज्ञानदेव रहाणे, किरण गुंजाळ, संजय कानवडे, मिलिंद टपाल, झोडंगे आदिसह त्याचे सर्व सहाकारी हा मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहे. राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात व आ. डॉ. सुधीर तांबे यांनाही त्यांनी निवेदन देऊन लक्ष्य वेधले आहे.